Aurangabad Saam TV
महाराष्ट्र

Aurangabad: राज ठाकरेंच्या सभेला परवानगी दिली तर रस्त्यावर उतरू; 'वंचित'चा इशारा

औरंगाबाद शहरात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नका, राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडेल.

लक्ष्मण सोळुंके

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात होणाऱ्या राज ठाकरे यांच्या जाहीर सभेला परवानगी देऊ नका, राज ठाकरे यांच्या सभेमुळे शहरातली कायदा सुव्यवस्था बिघडेल, अशी भीती व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीने राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला विरोध दर्शवला आहे. तसंच राज यांच्या सभेला परवानगी मिळाली तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा देखील वंचीत बहुजन आघाडीकडून देण्यात आला आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यापासून पक्षबांधणीसाठी सभा घेण्याचा धडाका लावला आहे. शिवाजी पार्क नंतर ठाणे (Thane) आणि येत्या १ मे रोजी ते औगंगाबादेत मोठी सभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्या राज यांनी आपल्या भाषणामधून मशिदींवरील भोंग्याचा प्रश्न उपस्थित केला असून तो त्यांनी चांगलाच लावून धरला आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या भाषणांमुळे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत असल्याचे कारण देत वंचित बहुजन आघाडीने या सभेला परवानगी देवू नये अशी भूमिका घेतली आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान, एकीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांकडून सभेची जय्यत तयारी सुरू असताना मराठवाडा सांस्कृतीक मंडळ (Marathwada Cultural Circle) बुक करण्यात आलं आहे. सभेला परवानगी मिळावी म्हणून पोलिस आयुक्तांकडे मनसेकडून आजच अर्ज देखील दाखल करण्यात आला असतानाच. आता दुसरीकडे या सभेला विरोध दर्शवत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी देखील पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सभेला परवानगी नाकारण्याबाबत देण्यात आलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : उंचावरून कोसळणारे मुंबईजवळील ५ पांढरे शुभ्र धबधबे, 'ही' सुंदर ठिकाणे खूपच कमी लोकांना माहितेय

महागड्या औषधांची गरज पडणार नाही! 'हे' एक फळ हाय ब्लड प्रेशर करेल कंट्रोल, हृदयही राहील निरोगी!

Famous Actress : एकटीला बोलावलं अन्...; दिग्दर्शकाकडून प्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडी वागणूक, सेटवर नेमकं झालं काय?

Ladki Bahin Yojana : ₹३००० की ₹१५००, लाडक्या बहि‍णींच्या खात्यात किती पैसे येणार? मे-जून हप्त्याची महत्त्वाची अपडेट

Hidden Cholesterol Marker: कोलेस्ट्रॉल रिपोर्ट नॉर्मल असूनही का येतो हार्ट अटॅक? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT