Anna Hazare : 'अण्णा हजारेंनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला तर.. आम्हीही उपोषण करु' Saam TV
महाराष्ट्र

Anna Hazare : 'अण्णा हजारेंनी पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतला तर.. आम्हीही उपोषण करु'

'सरकारच्या या निर्णयाबाबत जर जनतेला मान्य असेल तर मला काहीच हरकत नाही.' असं अण्णा हजारेंनी व्यक्त केलं मत.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उद्यापासून पुकारलेले उपोषण मागे घेतल्यानंतर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी राळेगणसिद्धी (Raleganasiddhi) येथे येऊन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे.

अण्णांनी वाईन (Wine) विरोधात सरकारला उपोषणाचा इशारा दिला होता त्या पार्श्वभूमीवर या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी अण्णांची भेट घेऊन निवेदन दिले आहे यावेळी हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याचं द्राक्ष उत्पादक (Grape Growers) शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडली.

दरम्यान यावेळी अण्णा हजारे यांनी त्या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि ते म्हणाले ' सरकारच्या या निर्णयाबाबत जर जनतेला मान्य असेल तर मला काहीच हरकत नाही' असं त्यांच्याशी चर्चा करतांना म्हटले आहे. तसंच तर जर अण्णा हजारे यांनी तीन महिन्यानंतर उपोषण करण्याचा निर्णय घेतला तर द्राक्ष उत्पादक राळेगणसिद्धी येथे येऊन साखळी उपोषण करू असा इशारा देखील द्राक्ष उत्पादक यांनी दिला आहे.

त्यामुळे सध्या जरी वाईन चा मुद्दा हा अण्णांच्या उपोषण स्थगिती मूळे थांबलेला असला तरी भविष्यात तीन महिन्यानंतर सरकार काय भूमिका घेते आहे या कडे द्राक्ष उत्पादक शेतकरी सह सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peshwai Saree Designs: नाकात नथ अन् गळ्यात हार, पेशवाई साडीचा थाटच न्यारा, या 5 डिझाईन्स नक्की ट्राय करा

Health Care : चाळीशीनंतर महिलांनी भोपळ्याच्या बिया का खाव्यात? जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

Maharashtra Live News Update: बारामतीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा जनता दरबार सुरू

Orange Benefits: रोज एक संत्री खा अन् नेहमी तंदुरुस्त राहा; वाचा संत्री खाण्याचे आरोग्यदायी फायदे

HPCL Jobs: हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये नोकरीची संधी; ७०० पेक्षा जास्त पदांसाठी भरती; वर्षाला पॅकेज ५० लाख रुपये; अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT