Suresh Dhas on Prajakta Mali Saam Tv News
महाराष्ट्र

Suresh Dhas: मी माफी मागणार नाही.. प्राजक्ता माळीच्या मागणीवर सुरेश धस यांचं उत्तर

Suresh Dhas on Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्यावर पत्रकार परिषद घेतली. ज्यात तिनं सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केलीय. त्यावर सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

Bhagyashree Kamble

आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडे, वाल्मिक कराड यांना लक्ष्य करतानाच इव्हेंट मॅनेजमेंटच्या संदर्भात अभिनेत्री प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना, सपना चौधरी यांची नावं घेतली होती. सुरेश धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतल्यानं तिला सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. त्यानंतर आज प्राजक्ता माळीनं भर पत्रकार परिषदेत आमदार सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणी केली. याच मागणीला सुरेश धस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

आमदार सुरेश धस यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केले आहे. त्याचा निषेध व्यक्त करते, असं प्राजक्ता माळी म्हणाली. तसंच सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली. यावर बीडचे आमदार सुरेश धस यांनी मी माफी मागणार नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. तसंच माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं काम सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

'माझं जे स्टेटमेंट आहे. ते पुन्हा एकदा त्यांनी रिव्हर्स करून पाहावं. मी काही चुकीचं बोललो नाही. त्यात मी निषेध व्यक्त करण्यासारखं काही बोललो देखील नाही. मुख्य म्हणजे हे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचं काम सुरू आहे', असं सुरेश धस म्हणाले. माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे, असं सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

'प्राजक्ता माळीनं त्यांचा गैरसमज दूर करून घ्यावा. त्यांना राजकारणात खेचण्याचा काही संबंध नाही. त्या काही माझ्या शत्रू नाहीत. माझी आणि त्यांची काही ओळख देखील नाही. मी त्यांचा टीव्हीवरील एक कार्यक्रम पाहत असतो. जर त्यांनी माझा निषेध केला तर, मी त्यांचा टीव्हीवरील तो कार्यक्रमही बघायचं बंद करतो', असं सुरेश धस म्हणाले. 'तसंच मी या प्रकरणी कुणाचीही माफी मागणार नाही', अशी भूमिका सुरेश धस यांनी घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT