I Love Mohammad" and "I Love Mahadev" banners creating nationwide debate and stirring political tensions Saam Tv
महाराष्ट्र

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

The Rising Banner Controversy: देशात ठिकठिकाणी 'आय लव्ह मोहम्मद' अशी बॅनरबाजी केली जातेय.. मात्र ही बॅनरबाजी नेमकी कशासाठी? त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरु झालेलं 'आय लव्ह महादेव' नेमकं काय आहे?

Omkar Sonawane

मुळात या वादाचा केंद्रबिंदु होता.. उत्तर प्रदेशातील कानपुरमधील सय्यद नगर.. 4 सप्टेंबरला बारावफातच्या मिरवणुकीत पहिल्यांदा आय लव्ह मोहम्मद' लिहिलेले पोस्टर पाहायला मिळाले. त्यानंतर परवानगीशिवाय मिरवणूक आणि पोस्टर लावल्यानं पोलिसांनी धक्काबुक्की करणाऱ्यांना अटक केली.. मुळात विरोध बॅनरला नसून धार्मिक कार्यक्रमाचा तंबू परवानगीशिवाय उभारल्यानं ही कारवाई करण्यात आली, असं पोलिसांनी सांगितलं आणि तिथूनच वादाला सुरुवात झाली.

त्यातच आता महाराष्ट्रात आय लव्ह मोहम्मदला प्रत्युत्तर म्हणून 'आय लव्ह महादेव'ची बॅनरबाजी सुरु झालीय.. त्यामुळे या दोन्ही घोषणांवरून राजकारण चांगलचं पेटलयं... M फॉर महादेव, M फॉर महाराष्ट्र, असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी टीका केलीय.. तर आय लव्ह मोहम्मद लिहण्यात गैर काय? असा सवाल अबू आझमींनी विचारलाय...

आय लव्ह मोहम्मद म्हणत उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गुजरात, तेलंगणा, महाराष्ट्रात मोर्चे काढून पोलिसांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आलाय. तर जागोजागी आय लव्ह मोहम्मद असे बॅनर झळकल्यानं त्याला उत्तर म्हणून I LOVE MAHADEV चे बॅनरही आता जोरदारपणे झळकावले जात आहेत.. मात्र या बॅनरबाजीमुळे समाजातील अधिक तणाव निर्माण होणार नाही या दृष्टीनं सरकारनं वेळीच पावलं उचलणं गरजेचं आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT