Pankaja Munde  Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde: 'जागा नसल्यानेच मी विधानपरिषदेवर', पंकजा मुंडेंना महायुतीत 'जागा' नाही?

Maharashtra Politics: लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची विधानपरिषदेवर वर्णी लागलीय. मात्र आपल्याला महायुतीत जागा नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय.. पंकजा मुंडे महायुतीत जागा नाही, असं का म्हणाल्या? वाचा स्पेशल रिपोर्ट....

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

लोकसभेला पराभव झाल्याने भाजपने पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर संधी दिली. मात्र 2 वेळा खासदार असलेल्या प्रीतम मुंडेंनी बहीण पंकजा मुंडेंसाठी बीडची जागा सोडली. त्यामुळे आता प्रीतम मुंडेंचं पुनर्वसन कसं करणार? याविषयी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला असता मलाच महायुतीत लढण्यासाठी जागा नसल्याचं वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलंय.

भाजपच्या दिग्गज नेत्या असलेल्या पंकजा मुंडेंना 2019 पासून सलग 2 निवडणुकीत पराभव पत्करावा लागलाय.. मात्र त्यांची राजकीय वाटचाल कशी आहे, याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

पंकजा मुंडे यांची राजकीय वाटचाल

पंकजा मुंडे या 2009 मध्ये परळीतून आमदार म्हणून निवडून आल्या. 2014 मध्ये त्या पुन्हा निवडून आल्या आणि त्यांना ग्रामविकास, महिला व बालकल्याण मंत्रिपद मिळालं. 2019 विधानसभेला धनंजय मुंडेंकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे 2024 लोकसभा निवडणुकीत बजरंग सोनवणे यांनी त्यांचा प्रभाव केला. नंतर 2024 मध्ये विधानपरिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागली.

लोकसभेला दुरावलेला ओबीसी मतदार पुन्हा जवळ करण्यासाठी भाजपने पंकजा मुंडेंना संधी दिली आहे. त्यामुळे आता पंकजा मुंडेंची विधानसभेसाठी जागेची शोधाशोध थांबलीय. मात्र पंकजा मुंडेंसाठी जागा सोडणाऱ्या प्रीतम मुंडेंना विधानसभेला संधी मिळणार की संघटनेत नियुक्ती होणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Politics : दोन पाटलांमध्ये कलगीतुरा, सांगलीत राजकीय राडा; सभापती निवडणुकीआधीच डायलॉग हाणला, इतिहासच काढला

Virar Picnic Spot : हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र अन् उंच डोंगर; वीकेंडला फिरायला 'विरार'च बेस्ट, पाहा टॉप ५ डेस्टिनेशन्स

Maharashtra Live News Update: नांदेडच्या बिलोली तालुक्यातील चर्चेत असलेला तलवार बाबा साम टीव्हीवर

Crispy Bitter Gourd Pakoda: संध्याकाळच्या नाश्त्याला बनवा कुरकुरीत कारल्याची भजी, सोपी आहे रेसिपी

Satara : साताऱ्यात शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर; मृतदेहांची झाली अदलाबदल, कुटुंबाकडून संताप

SCROLL FOR NEXT