Horrific Car Crash in Matheran Saam tv news
महाराष्ट्र

Matheran Accident: माथेरान घाटातून उतरताना ब्रेक फेल झाल्यानं कार उलटली; ६ पर्यटक अडकले अन्...

Horrific Car Crash in Matheran: माथेरानमध्ये ब्रेक फेल झाल्यामुळे कारचा भीषण अपघात. हैदराबादहून आलेले सहा प्रवासी थोडक्यात बचावले. पोलिसांच्या मदतीने जखमींना रायगड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

Bhagyashree Kamble

माथेरानमध्ये विचित्र अपघाताची घटना उघडकीस आली आहे. हैदराबादच्या प्रवाशांचा माथेरानमध्ये भीषण कार अपघात घडला. ब्रेक फेल झाल्यानं कार उलटली. कारमध्ये सहा प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्त फॅमिली हैदराबादहून माथेरानला फिरायला आली होती. दरम्यान, परतीच्या प्रवासावेळी अपघात घडला. या अपघातात जीवितहानी झालेली नाही, मात्र कारचं प्रचंड नुकसान झालं आहे.

हैदराबादहून एक फॅमिली माथेरानला फिरण्यासाठी आली होती. कारमधून ही फॅमिली प्रवास करीत होती. कारमध्ये सहा प्रवासी प्रवास करीत होते. दोन मुले आणि तीन मुलींचा समावेश होता. जुमापट्टी रेल्वे स्थानकातील पहिले रेल्वे क्रॉसिंग मार्गावरच वाहनाचे नियंत्रण सुटले.

घाट उतरत असताना वाहनाचा ब्रेक फेल झाला. कार थेट लोखंडी सुरक्षा रेलिंगला धडकली. त्यामुळे कार रस्त्याच्या खालच्या वळणावर हवेत उडून सिमेंट सुरक्षा कठड्याला धडकली. कार उलटल्यानंतर एअर बॅग उघडली. वाहनातील समोर बसलेले प्रवासी थोडक्यात बचावले.

साकेत राम,रेयूत त्रिलोक,काशू तेजस्विनी,रेहुक पूजिता,रेव्ह वैष्णवी आणि तेजस्वी इम्कोरल अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत. सहा प्रवासी हैदराबाद राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील एका गावातील रहिवासी आहेत. अपघात घडल्यानंतर अर्धा तास त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही.

नेरूळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दलाच्या मदतीने त्यांनी जखमींना तातडीने रायगड हॉस्पिटलमध्ये नेलं. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

500 Rupee Note: तुमच्या खिशातली ५०० ची नोट खरी की खोटी? आरबीआयच्या या सोप्या ट्रिक्सने तपासा

SCROLL FOR NEXT