Lightning Strike Saam tv
महाराष्ट्र

Gadchiroli News : हसतं खेळतं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त; वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Gadchiroli News : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

हेमंत भाडेकर

Gadchiroli News : लग्न कार्यक्रम आटोपून गावाकडे परत जात असताना झाडाखाली थांबलेल्या पती-पत्नी आणि दोन मुलांवर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

भारत राजगडे (35 वर्ष), अंकिता भारत राजगडे (28 वर्ष), बाली भारत राजगडे (2 वर्ष), देवाशी भारत राजगडे (4 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. भारत राजगडे हे आपल्या पत्नीसह दोन मुलांना घेऊन लग्न कार्यक्रमासाठी गेले होते. (Latest News Update)

लग्नावरुन सायंकाळी गावाकडे परत जात असताना अचानक मेघगर्जना आणि वादळ सुरू झाले. त्यामुळे त्यांनी रस्त्यालगच्या झाडाचा आसरा घेतला. यावेळी वीज कोसळल्याने चौघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याने आमगाव बुटी गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. (Gadchiroli News)

चंद्रपुरात वीज पडून 36 शेळ्यांचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये मेघगर्जनेसह आज दुपारी आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले असतानाच एका शेतकऱ्याच्या तब्बल 36 शेळ्या वीज पडून मृत्युमुखी पडल्या. जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील बिबी शेतशिवारात ही घटना घडली असून, जब्बार खाजा मिया कुरेशी या शेतकऱ्याच्या या शेळ्या आहेत.

आज दुपारच्या सुमारास वीज कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. तेव्हा या शेळ्या शेतात चरत होत्या. नेमकी त्याचवेळी तिथे वीज कोसळली आणि शेळ्या दगावल्या. यात अंदाजे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : रागावर नियंत्रण ठेवावे, मन प्रसन्न राहील; ५ राशींच्या लोकांची दुप्पट वेगाने प्रगती होणार

Famous Actor Death: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Late Night Eating: रात्री पोटभर जेवणं पडेल महागात; डॉक्टरांचा इशारा, वाढू शकतात गंभीर आजार

Maharashtra News Live Update: CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस पुणे स्टेशनवर चौथ्या डब्याचा एक ट्रॉली घसरला.

ILS Law College: 'वसतिगृहात दारू आणि ड्रग्जच्या पार्ट्या', कॉलेजच्या वसतिगृहात विद्यार्थ्याचं रँगिंग

SCROLL FOR NEXT