house sets fire in solapur  saam tv
महाराष्ट्र

Fire: बायकोशी भांडला अन् दिलं पेटवून स्वतःचं घर; संसाराची झाली राख रांगाेळी

नागरिकांनी तातडीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.

विश्वभूषण लिमये

सोलापुर : साेलापूरातील (solapur) अंबिका नगर नक्का वस्ती येथील राहत्या घरात पत्नीला मारहाण करून हाकलून दिल्यानंतर स्वतःच्या घराला (house) पतीने आग (fire) लावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबतची माहिती परिसरातील नागरिकांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (solapur latest marathi news)

श्यामसुंदर भंडारी असं घर पेटवून देणाऱ्याचे नाव आहे. घरातील गॅसच्या टाकीचा स्फोट झाल्याने आग माेठ्या प्रमाणात धुमसत होती. या आगीत घरातील सर्वच प्रापंचीक साहित्य जळून खाक झालं असून जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले आहे अशी प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे.

अग्निशामक दलाच्या गाड्या तत्काळ दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना होताना टाळली. दरम्यान कुटुंबातील वादातून हा प्रकार भंडारी याने केल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT