Jitendra Patil  Saam TV
महाराष्ट्र

विवाहीतेच्या आत्महत्येनंतर, पोलीस महिलेच्या पतीनं घेतला गळफास; सांगलीत चाललंय काय?

सांगलीच्या विटा मध्ये काल एका महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती.

विजय पाटील

सांगली: सांगलीच्या संजयनगर पोलीस स्टेशन मधील महिला पोलिसांच्या पतीने आत्महत्या केली आहे. जितेंद्र शहाजी पाटील असे त्याचे नाव आहे. नायलॉनने घरातच जिन्यामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ते यशवंतनगर मध्ये राहत होते. पहाटेच्या सुमारास ही आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस (Police) अधिक तपास करत आहेत. बॉडी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शव विच्छेधनासाठी आणण्यात आली आहे आहे.

दरम्यान सांगलीच्या विटा मध्ये काल एका महिलेने आपल्या दोन मुलांसह आत्महत्या केली होती. ती घटना ताजी असतानाच आता ही घटना घडली आहे. त्यामुळे सांगलीमध्ये (Sangali) आत्महत्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. पतीसोबत झालेल्या किरकोळ वादातून विवाहितेने आपल्या दोन चिमुरड्यांसह विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एक महिन्याचे बाळ आणि 4 वर्षांच्या मुलीसोबत आईने आत्महत्या केली. घटनास्थळी पोलिसांनी (Police) पोहचून बॉडी क्रेनच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली होती.

महाराष्ट्रामध्ये आत्महत्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरुण मुले, विवाहित तरुणी, शेतकरी यांच्या आत्महत्यामध्ये सतत वाढ होत आहे. किरकोळ वादातूनही महिला, तरुण मुलं आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Doctor Attack: डॉक्टर रुग्णाला समजावत होते, मुलगा संतापला; केबिनमध्ये घुसून डॉक्टरला मारहाण

Famous Actress Death: प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली; फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT