पत्नीला भाच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त पतीने केली पत्नीची हत्या  File Photo
महाराष्ट्र

पत्नीला भाच्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त पतीने केली पत्नीची हत्या

पत्नीला भाच्या सोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना जळगावमध्ये उघडकीस आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जळगाव : पत्नीला भाच्या सोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहून संतप्त झालेल्या पतीने पत्नीचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना आज सकाळी पाल (ता. रावेर) येथे उघडकीस आली आहे. पोलीसांनी या प्रकरणी पतीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

याबाबतचे वृत्त असे की, पाल येथील बर्डी परिसरात राहणार्‍या साधू मानसिंग बारेला व त्याची पत्नी सायजाबाई बारेला यांचा दूरचा भाचा, भायला बारेला राहणार पिंपलखुंटा (जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश) हे तिघे दारु पित बसले होते. दरम्यान भायला याने साधू यास दारू आणण्यास पाठवले. तर मानसिंग व सायजाबाई यांची मुलगी घरात होती. मुलीला देखील त्याने वीस रुपये देऊन चॉकलेट गोळ्या आणण्यासाठी दुकानाला पाठवले.

हे देखील पहा -

हे दोघेही घरातून बाहेर गेल्याचा फायदा घेत सायजाबाई सोबत आक्षेपार्ह कृत्य सुरु केले. दरम्यान दारू घेऊन परतलेल्या साधू बारेलाने त्याचा भाचा भायला बारेला व पत्नीला अनैतिक सबंध करत असताना रंगेहात पकडले. हा प्रकार पाहून संतप्त झालेल्या साधूने पत्नी सायजाबाईला लाकडी दांडक्याने हातावर, पायावर, बरगडीवर गंभीर मारहाण केली व या मारहाणीत ही महिला जागेवरच मयत झाली.

यावेळी भायला बारेला हा पळून गेला. ही घटना समजताच पोलिसांना घटनास्थळी जाऊन पंचनामा करून महिलेचा मृतदेह रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान रावेर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून साधू मानसिंग बारेला रा.पाल, बर्डी व भायला भंगा बारेला यास पिंपलखुंटा, जिल्हा खंडवा, मध्यप्रदेश येथून ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

दुसऱ्या दिवशी घटना आली उघडकीस

साधू बारेला याने त्याची पत्नीस काल (ता.५) रोजी सायंकाळी चार वाजता ठार मारले होते. घटना घडल्यानंतर मृतदेह रात्रभर घरातच पडलेला होता. दुसऱ्या दिवशी मयत महिलेच्या वडिलांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांत माहिती दिली होती.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar : हृदयद्रावक! इकडे बहिणीचा जन्म आणि दुसरीकडे भावाचा मृत्यू; माऊलीच्या आक्रोशाने सातपुडा सुन्न

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

पावसाळ्यात दही खाल्ल्याने सर्दी-खोकला होतो का? Should You Eat Curd During Monsoon

Eexcessive sleepiness: सतत झोप येतेय? या 7 धक्कादायक कारणांमुळे तुमचं शरीर देतंय मोठा इशारा

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT