Husband friend forced physical relation with wife in Yavatmal  Saam TV
महाराष्ट्र

Yavatmal News: मित्रानेच केला घात! पती ड्युटीवर जाताच पत्नीवर लैगिंक अत्याचार; यवतमाळमधील धक्कादायक घटना

Yavatmal Crime News : पतीच्या मित्राने विवाहितेस पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.

Satish Daud

संजय राठोड, साम टीव्ही यवतमाळ

मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना यवतमाळ शहरातील आर्णी परिसरात घडली. पतीच्या मित्राने विवाहितेस पेढ्यातून गुंगीचे औषध दिलं. त्यानंतर तिचे आक्षेपार्ह फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विजेंद्र (४०, रा.यवतमाळ) असे आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला पती आणि दोन मुलांसह आर्णी तालुक्यातील एका परिसरात राहते. याच परिसरात तिच्या पतीचा प्राध्यापक मित्र देखील राहतो.

जानेवारी महिन्यात पीडित महिलेचा पती ड्युटीवर गेला होता. त्यावेळी पीडिता घरात एकटीच होती. याच गोष्टीची संधी साधून आरोपी विजेंद्र तिच्या घरी आला. त्याने प्रसाद म्हणून पीडितेला पेढा खायला दिला. पेढा खाल्ल्यानंतर पीडितेची शुद्ध हरपली.

काही वेळानंतर तिला जाग आली, तेव्हा आरोपी तिच्या घरातच बसून होता. तू मला खूप आवडते. तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे आहे, अशी मागणी आरोपीने पीडितेकडे केली. पीडितेने नकार दिला असता, आरोपी विजेंद्रने फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. जाग आल्यानंतर आरोपी विजेंद्र हा घरातच बसून होता.

काही दिवसांनी विवाहिता ही घरी एकटीच असताना आरोपी पुन्हा तिच्या घरी आला. त्याने जबरदस्तीने पीडितेसोबस शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच होते. त्याने अनेकदा पीडितेचे लैंगिक शोषण केले.

दरम्यान, २३ मार्च रोजी आरोपी रात्री ११ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरी गेला. त्याने तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलांना जाग आल्यानंतर आरडाओरड झाली. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेला.

बदनामीच्या भीतीपोटी पीडितेने आजवर तक्रार दाखल केली नव्हती. मात्र आरोपीचे कृत्य दिवसेंदिवस वाढतच असल्याने अखेर तिने तक्रार दाखल केली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विजेंद्र याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kataldhar Waterfall : लोणावळ्यापासून हाकेच्या अंतरावर आहे 'कातळधार' धबधबा, येणार वीकेंड येथेच प्लान करा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Marathi Serial Update : लोकप्रिय मराठी मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, अडीच वर्षांचा प्रवास अखेर थांबणार

Maharashtra Live News Update: इंडिया आघाडीचा आज निवडणूक आयोगावर मोर्चा

Electric Scooter: OLA इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत मोठी घट, पण इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी अजूनही जोरात

SCROLL FOR NEXT