दुबारपेरणी व कर्जामुळे पती- पत्नीची आत्महत्या SaamTv
महाराष्ट्र

वर्षभरापूर्वी विवाह झालेल्या पती-पत्नीची आत्महत्या! बुलढाण्यातील धक्कादायक घटना

मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर शिवारातील धक्कादायक घटना..

संजय जाधव

संजय जाधव

बुलडाणा: एक वर्षांपूर्वी विवाह झालेल्या पती - पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मोताळा तालुक्यातील इब्राहिमपूर शिवारात उघडकीस आलीये. 26 वर्षीय शिवशंकर सिरकरे आणि 24 वर्षीय कल्पना सिरकरे अशी मृतक दाम्पत्याची नावे असून हे दोघेही मोताळा कोथळी येथील रहिवासी आहेत. (Buldhana Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार , मृतक शिवशंकर आणि कल्पना या दोघांचेही हे दुसरे लग्न होते. वर्षभरापूर्वी त्‍यांचे लग्न झाले होते. दोघेही नेहमीप्रमाणे शेतात गेले असता दुपारी इब्राहिमपूर शिवारातील शेतात दोघेही मृतावस्थेत आढळले. त्यांच्याजवळ विषारी औषधचा डब्बा आढळून आलाय. या घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मर्ग दाखल केला आहे. तर दोघांनी केलेल्या आत्महत्तेचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलीस पुढील घटनेचा तपास करत आहेत.

हे देखील पहा-

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT