Barshi Gadegaon Village  Saam TV
महाराष्ट्र

Barshi News : चुलीतील ठिणगीमुळे झोपडीला आग; पतीसह पत्नीचा होरपळून मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

बार्शी (Barshi) तालुक्यातील गाडेगाव परिसरात आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

विश्वभूषण लिमये

Barshi News : सोलापूर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. घरात पाणी तापवण्यासाठी चूल पेटवली असताना अचानक ठिणगी उडाली. यामुळे झोपडीला भीषण आग लागली. या आगीत वृद्ध पती-पत्नीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. (Latest Marathi News)

बार्शी (Barshi) तालुक्यातील गाडेगाव परिसरात आज पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. भीमराव काशीराम पवार (वय ९५ वर्ष) आणि कमलबाई भीमराव पवार (वय ९० वर्ष) अशी मृत पती पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडेगाव परिसरात राहणाऱ्या कमलबाई ह्या नेहमीप्रमाणे सकाळीच उठल्या.त्यानंतर त्यांनी घरातील चुल पेटवली आणि अंघोळीसाठी गरम पाणी ठेवले. यानंतर त्या घराबाहेर बांधलेल्या म्हशीचा चारा पाणी करण्यासाठी गेल्या.

दरम्यान, म्हैस बांधत असताना घरातील चुलीची ठिणगी उडाल्याने झोपडीला भीषण आग लागली. बघता-बघता आगीने रौद्ररुप धारण केलं. कमलाबाई यांचे पती घरात झोपले असल्याने भर आगीतच कमलबाई आपल्या पतीला उठवण्यासाठी गेल्या.

मात्र, अचानक आगीने उग्ररूप धारण केले. त्यामुळे दोघांनाही घराबाहेर पडता आले नाही. घटनेची माहिती मिळताच, गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. अखेर कमलाबाई यांच्यासह त्यांचे पती भीमराव पवार यांच्यासह आगीत होरपळून दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT