Parbhani Crime राजेश काटकर
महाराष्ट्र

परभणी येथील सेलू गावात पती- पत्नीची आत्महत्या; कारण अद्याप अस्पष्ट

राजवी गांधी नगरात गळफास घेऊन पतीने आत्महत्या केली, तर पत्नीचा पलंगावर मृतदेह आढळून आला.

राजेश काटकर

परभणी: सेलु शहरातील राजीव गांधी नगरातील अर्जुन गणेश आवटे (वय-३२) यांने लोंखडी पञाच्या आडूला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर पत्नी प्रियंका (वय- २८) हिचा मृतदेह पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. आवटे पती- पत्नी एका खोलीत रविवारी राहत्या घरी झोपले होते. सोमवारी सकाळी ७ वाजले तरी दोघेही झोपेतून उठले नसल्याने अर्जुन यांच्या बहिणीने रूमची कडी वाजवली तरी ते बाहेर आले नाहीत.

हे देखील पहा-

अर्जुनच्या बहिणीने तिच्या वडीलांना या विषयी माहिती दिली. त्यानंतर दरवाजा तोडून पाहिले असता दोघेही मृत अवस्थेत आढळून आले आहेत. अर्जुनचा ३ वर्षांपूर्वी प्रियंकाशी विवाह झाला होता. तो शहरात ऑटोरिक्षा चालवून उपजीविका भागत असत. घटनास्थळी पोलीस निरीक्षक रावसाहेब गाडेवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला असून तपास सुरु आहे.

प्रियंका हिचा मृतदेह पलंगावर आढळल्याने अर्जुनने प्रियंकाला आधी मारून नंतर आत्महत्या केली की काय तपासानंतरच स्पष्ट होणार आहे, असे गाडेवाड यांनी यावेळी सांगितले आहे. प्रियंका चा मुत्यू कसा झाला याचा तपास सुरु आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंजिनिअरसह आख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

SCROLL FOR NEXT