husband and wife together honey trap on youth in satara Saam Tv
महाराष्ट्र

बायकोचं अश्लील चॅटींग करुन तरुणांकडून खंडणी उकळणाऱ्याला अटक

खंडणी मागणाऱ्या पती-पत्नीचा वाई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

ओंकार राजेंद्र कदम

सातारा : सध्या पैसे मिळवण्यासाठी सोशल मीडियावर तरुणांना ब्लॅकमेल केल जात आहे. हनीट्रपमध्ये अडकवून खंडणीची प्रकरणे अनेक समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील वाईमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. व्हॉट्सअप (Whatsapp) वर अश्लील मेसेज करत तरुण मुलांना आपल्या जाळ्यात अडकवत खंडणी मागणाऱ्या पती-पत्नीचा वाई पोलिसांनी (Police) पर्दाफाश केला आहे. (honey trap)

साताऱ्यातील (Satara) वाई तालुक्यात हनी ट्रॅपद्वारे अनेक युवकांना आपल्या जाळ्यात ओढून एका पतीने स्वतःच्या पत्नीच्या सहाय्याने तब्बल २ लाख ८९ हजार ५०० रुपये खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत बोपेगाव येथील युवकाने तक्रार दाखल केली असून कवठे आणि सटालेवाडी येथील युवकांचीही अशीच फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. (Husband and wife arrested for honey trap in Satara)

संशयित महिलेने व्हॉटस् अ‍ॅपवरून (WhatsApp) अश्लील चॅटिंग करून ते कुटुंबातील लोकांना दाखवून बदनामी करू, अशी धमकी देत ब्लॅकमेलिंग केले असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या पूनम हेमंत मोरे (वय 30) आणि हेमंत विजय मोरे (३१, मूळ रा. ओझर्डे, ता. वाई, सध्या रा. कुडाळ, ता. जावली) अशी संशयित पती-पत्नीचे नाव आहे. या प्रकाराने वाई तालुक्यात खळबळ उडाली असून या पती-पत्नीने अजुनही अनेक युवकांना गंडा घातल्याचा संशय व्यक्त केला जात असून अशा व्यक्तींनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्याचे आव्हान पोलिसांनी (Police) केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivsena Hearing: शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का? सुप्रीम कोर्टाचा सवाल, सुनावणीत नेमका काय युक्तिवाद झाला?

Medicine Short Form : औषधाच्या पाकिटावर लिहिलेल्या AC, OD, BD, TD, QID, SOS या शॉर्टफॉर्मचे अर्थ काय? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ

नागपूर-तुळजापूर महामार्गावर दोन कार धडकल्या; वृद्ध महिला ठार, मोकाट जनावरं अचानक आडवी आल्यानं घडला अनर्थ

Thursday Horoscope : जवळच्या माणसांसोबत दिवस आनंदात जाईल, ५ राशींच्या व्यक्तींचे अडथळे वाढणार; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT