भारत बंदची रॅली काढणे भोवले; नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल जयेश गावंडे
महाराष्ट्र

भारत बंदची रॅली काढणे भोवले; नाना पटोले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने भारत बंदला पाठींबा देत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान सोमवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी अकोला येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली.

अॅड. जयेश गावंडे

अकोला : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ काँग्रेसने भारत बंदला पाठींबा देत बंदमध्ये सक्रिय सहभाग घेतला. दरम्यान सोमवारी २७ सप्टेंबर रोजी दुपारी अकोला येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात निषेध रॅली काढण्यात आली. ही रॅली विना परवानगी काढण्यात आल्याने नाना पटोले यांच्या सह शेकडो कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती सिटी कोतवाली पोलिसांनी २८ सप्टेंबर रोजी दिली. पटोले यांच्यासह 120 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हे देखील पहा :

परवानगी न घेता रॅली काढणे व कोविड-१९ च्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप पटोले व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोटारसायकल रॅलीचे आयोजन केले होते. अकोल्यातील स्वराज्य भवन येथून या रॅलीला सुरवात झाली. ही रॅली रामदास पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शहरातील विविध प्रमुख व आंतर मार्गाने मार्गक्रमण करत निघाली होती.

या रॅली दरम्यान कोरोना नियमांचे उल्लंघन केल्या गेले. साथरोगाचा फैलाव होईल, अशा प्रकारे रॅलीतील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे वर्तन होते. कोविड नियमांचा फज्जा उडविला गेला. यामुळे या रॅलीत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

Maharashtra News Live Update: धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धुळ्यात खरीप पेरण्या मंदावल्या; केवळ २५ टक्के पेरणी

FDA Action: 904 धाडी, 34.66 कोटींचा मुद्देमाल जप्त; महिन्याभरात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर धडक कारवाई

SCROLL FOR NEXT