भीषण स्फोट रुपेश पाटील
महाराष्ट्र

पालघर मधील फटाके कंपनीत भीषण स्फोट

पालघर जिल्ह्यामधील डहाणू तालुक्यात एका फटाका कंपनीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पालघर : पालघर Palghar जिल्ह्यामधील डहाणू Dahanu तालुक्यात एका फटाका कंपनीत भीषण स्फोट explosion झाल्याची घटना घडली आहे. स्फोट झाल्यानंतर भीषण आग Fire लागली आहे. या भीषण स्फोटामुळे डहाणू तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. A huge explosion at a firecracker company in Palghar

स्फोटानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. आगीमुळे धोराचे लोट सर्वत्र दूरपर्यंत दिसून येत आहे. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप अजून कळू शकली नाही. या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आले नाही.

पहा व्हिडिओ

डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल Vishal फटाका कंपनीत भीषण स्फोट झाले आहे. डहाणू हायवेपासून १५ किमी अंतरावर जंगलामध्ये ही कंपनी आहे. अचानकपणे झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा ५ ते १० किलोमीटर अंतरावरील परिसरातील घरांना मोठे धक्के जाणवले आहेत. A huge explosion at a firecracker company in Palghar

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिक पोलीस प्रशासन व गावकरी घटनास्थळी दाखल असून, आग विझवण्याचे काम सुरू आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT