SSC, HSC Exam  Saam TV
महाराष्ट्र

SSC, HSC Exam : १०वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; परीक्षेच्या तारखा आल्या समोर

SSC HSC Board Exam 2024 : दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांची तारीख ठरली आहे. या तारखा कोणत्या आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. बोर्ड परीक्षेच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत. येत्या १५ दिवसांत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे. त्यामुळे आता समोर आलेल्या तारखांची माहिती जाणून घेऊ.

मिळालेल्या माहितीनुसार, २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारीपासून होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शाळा आणि कॉलेजमध्ये सध्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा सुरू आहे. विद्यार्थी या महिन्याच्या सुरूवातीपासूनच अंतिम परीक्षेच्या तारखा काय असणार या विचारात आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वीची परीक्षा ११ फ्रेब्रुवारी तर दहावीची परीक्षा २१ फ्रेब्रुवारीपासून सुरू होऊ शकते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे. असे असले तरी बोर्डाकडून मात्र अद्यापही या बाबात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून एकूण ९ विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीची परीक्षा घेतली जाते. यात मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागात परीक्षा होणार आहेत.

दहावी आणि बारावी दोन्ही परीक्षांचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागतील अशी शक्यता आहे. तसेच रेग्युलरमध्ये नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा लगेचच जुलै आणि ऑगस्टमध्ये घेतली जाते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: ३ दिवसांपासून शिंदे शहांच्या दारात, शिवसेना नावाला कलंक लावला - संजय राऊथ

Ambadas Danve : बंडखोर विरुद्ध निष्ठावंत असा हा लढा आहे; अंबादास दानवेंचा महायुतीवर हल्लाबोल

Maharashtra Assembly Election : आबांचा विरोधक मुलाशी लढणार, तासगावमध्ये २ पाटलांमध्ये काँटे की टक्कर

Jalna News : जालन्यातील धांडेगावचे ग्रामस्थ टाकणार मतदानावर बहिष्कार; रस्त्याच्या प्रश्नासाठी ग्रामस्थ आक्रमक

Government Job: समाज कल्याण आयुक्तालयात नोकरीची संधी; २१९ जागांवर भरती; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT