'प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात कसा असेल?': चंद्रकांत पाटील Saam Tv
महाराष्ट्र

'प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात कसा असेल?': चंद्रकांत पाटील

त्रिपुरा या ठिकाणी हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता काल शुक्रवारी अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक : त्रिपुरा या ठिकाणी हिंसात्मक घटनेचा निषेध व्यक्त करण्याकरिता काल शुक्रवारी अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाकडून मोर्चा काढण्यात आला होता. या घटनाक्रमाला हिंसक वळण लागल्याचे बघायला मिळाले होते. त्याच्या निषेधार्थ आज भाजपने शहर बंदचं आवाहन करण्यात आले होते. या बंदला आता हिसंक वळण लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गाड्यांची तसेच दुकानांची तोडफोड करण्यात येत आहे. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला खूप कीव येत आहे आणि वाईट वाटतं की राजकारणाकरिता आपण किती लाचार झालो आहेत.

हे देखील पहा-

बाळासाहेब ठाकरे आज असते, तर त्यांनी थोबाडीत लगावले असते. काय चाललंय काय हे? राज्य करा, मुस्लिमांची मते मिळवा, ९५ टक्के मुसलमान हा देशप्रेमी आहे. मात्र, ५ टक्के जो गडबड करतो, त्याचा निषेध करा ना! मुस्लिमांच्या मतांकरिता हे सगळं करत आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी केला आहे. ते म्हणाले की, ५ टक्के मुसलमान त्यांच्या धार्मिक नेत्यांच्या चिथावणीला बळी पडून हिंसक होत असतात, त्यावर सुद्धा तुम्ही टीका करत नाही? त्रिपुराचे कारण सांगून, अमरावती, मालेगाव या ठिकाणी अस्थिरता निर्माण करणे योग्य आहे का?

काल अनेक ऑफिसेस आणि दुकाने फोडण्यात आली आहेत, यावर टीका करा, मुस्लिम मतांची काळजी करु नका, असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडीला यावेळी लगावला आहे. रझा अकादमी हा भाजपचे पिल्लू आहे, यावर म्हणाले की, सगळ्या गोष्टी आमच्याच आहेत का? काय सुरु आहे ही असली चेष्टा? प्रत्येक ठिकाणी भाजपचाच हात असतो का? एवढ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्त्या झाले आहेत, तरी भाजपचाच हात? तीन पक्ष एकत्र असून, तुम्ही दुबळे आहात. सरकार अपयशी आहेत. माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत, आजी गृहमंत्री आता आजारामधून उठले, तर मुख्यमंत्री दवाखान्यात आहेत. सध्या राज्य बाहेरुन चालवले जात आहे. त्रिपुरात घडलेल्या घटनेचा निषेध अमरावतीमध्ये करायला हरकत नाही. मात्र, शांततेत करा, ते घडत नसेल, तर त्याचा निषेध करायला नको का? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर आणखी एक धक्का; विमान तिकीट दर गगनाला भिडले, VIDEO

17 कोटींची चांदी घेऊन जाणारी व्हॅन पलटी; मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खळबळ|VIDEO

पुण्यातील रूग्णालयात टायमर बॉम्ब का ठेवला? आरोपीनं ATS ला शब्द ना शब्द सांगितलं, कारण ऐकूण पोलीस हादरले

Monsoon 2026: गुड न्यूज! २४ तासांत मान्सून धडकणार, पुढील ४ दिवस महाराष्ट्रात तुफान पाऊस

आदेश बांदेकरांच्या सुनेला पाहिलात का? दिसतेय जणू इंद्राची अप्सरा

SCROLL FOR NEXT