भुजबळ हे 'भाई' युनिव्हर्सिटीचे प्राचार्य- सुहास कांदे  Saam Tv
महाराष्ट्र

भुजबळ हे 'भाई' युनिव्हर्सिटीचे प्राचार्य- सुहास कांदे

भाजीपाला विकणारे 25 वर्षांत 25 हजार कोटींचे मालक कसे झाले?

अभिजित सोनावणे, साम टीव्ही, नाशिक

अभिजित सोनावणे

नाशिक : नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे Suhas Kande आणि पालकमंत्री छगन भुजबळ chhagan bhujbal यांचायतील खडाजंगी काही दिवसांपूर्वीच चव्हाट्यावर आली होती. नांदगावचा अतिवृष्टी दौरा वादळी ठरला होता. तर भुजबळांनी नियोजन समितीच्या निधीत गैरव्यवहार केल्याचा आरोप शिवसेनेचे Shivsena आमदार सुहास कांदे यांनी केला होता. याप्रकरणी आमदार सुहास कांदे यांनी छगन भुजबळ यांच्या विरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पुन्हा या वादाला नवे तोंड फुटले होते. सुहास कांदेंनी याचिका माघे घेण्यासाठी त्यांना छोटा राजन यांच्या पुतण्याने पुणे करून त्यांना धमकावले गेल्याचा आरोप त्यांनी केला होता. आता याप्रकरणी धक्कादायक खुलासा सुहास कांदे यांनी केला आहे. भुजबळांविरोधात हायकोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेण्यासाठी छोटा राजनच्या पुतण्याने फोन केल्याची तक्रार कांदे यांनी केली होती. या सर्व बाचाबाचीत सुहास कांदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. त्यांनी यावेळी अनेक गोष्टींचा उलगडला केला.

हे देखील पहा-

ते यावेळी म्हणाले, भुजबळ आणि माझ्यातले वाद म्हणजे महाविकास आघाडीचा वाद नाही आहे जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरून भुजबळ आणि माझ्यात वाद आहे. तर भुजबळांना जिल्हा नियोजन समितीचे काम वाटण्याचा अधिकार नाही. माझ्याकडे पुरावे आहेत. निधीच्या वाटपात गैरव्यवहार झाला आहे. निधीचे समसमान वाटप झालेले नाही. भुजबळांच्या गैरव्यवहाराचे सर्व पुरावे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत.

अंडरवर्ल्डमधून मला धमकीचा फोन आला होता;

तसेच पुढे सुहास कांदे म्हणाले, मला अंडरवर्ल्डमधून धमकीचा फोन आलं होता. माझ्या तक्रारीचा तपास नाशिकचे पोलीस आयुक्तांकडे आहे. पोलीस दूध का दूध आणि पाणी पाणी करतील. भुजबळांचे अंडरवर्ल्डसोबत आधीपासूनच संबंध आहेत. असा घणाघाती आरोप सुहास कांदे यांनी भुजबळांवर केला आहे.

भुजबळांचं पालकमंत्री पद काढावं;

पुढे बोलत असताना, भुजबळांचे पालकमंत्रिपद काढून घ्यावं अशीही मागणी आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. भुजबळ हे तर भाई युनिव्हर्सिटीचे प्राचार्य आहेत असाही टोला त्यांनी लगावला. एक भाजीपालावाला 25 वर्षात 25 हजार कोटीचा मालक कसा झाला? हे भुजबळांनी सांगावं

नाशिक जिल्ह्यात शिवसेनेवर कसा अन्याय होतोय, हे पुराव्यानिशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक सुहास कांदे यांच्या पाठीशी आहेत असेही ते म्हणले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीत भुजबळांनी भ्रष्टाचार केला आहे. तसेच भुजबळांसोबत वन टू वन सिद्ध करायला तयार असल्याचेही कांदे यांनी सांगितलं.

तर काल नाशिक मध्ये पूर परिस्थीची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असलेले छगन भुजबळांना प्रसन्न विचारले असता त्यांची प्रतिक्रिया;

पत्रकारांनी या प्रकरणाविषयी विचारले असता भुजबळ यांनी कांदे हेच नेते असून मी नेता नाही असा टोला लगावला होता. माझा काही संबंध नसताना छोटा राजन टोळी सोबत नाव जोडण्याचे कारस्थान करण्यात येत आहे. मी गेली ४० वर्षे राजकारणात काम करत असून, असे खोटेनाटे आरोप करून, आणि एखाद्या प्रकरणावरून प्रतिमा मलीन करण्याचे काम कांदे करत असल्याचे भुजबळ म्हणाले. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Assembly Election Results : राजकीय हलचालींना सुरवात; ओझर विमानतळावर खासगी विमान दाखल

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

SCROLL FOR NEXT