Hingoli Heater Blast Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Heater Blast: मोठी दुर्घटना! हिटरचा भीषण स्फोट; दीड वर्षांच्या बाळासह ५ जण होरपळले

Hingoli Accident News: या स्फोटात कुटुंबातील ५ जण भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

साम टिव्ही ब्युरो

Hingoli News: हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. एका घरात गरम पाण्याच्या हिटरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात कुटुंबातील ५ जण भाजले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.(Latest Heater Blast News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील राजुरा गावात ही भीषण घटना घडली आहे. घरात हिटर लावलेला असताना तो बंद करण्याचे लक्षात न राहिल्याने ही घटना घडली आहे. यावेळी घरात ५ व्यक्तींसह एक दीड वर्षांचं बाळ देखील होतं.

या घटनेत दीड वर्षांचं बाळ देखील भाजलं आहे. लहान बाळांची त्वचा नाजूक असल्याने या बाळाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेनं परिसरात एकच खळबळ उजडालीये. हिटरचा स्फोट झाला तेव्हा मोठा आवाज झाला. यावेळी जखमींना वाचवण्यासाठी शेजारच्या नगरिकांनी धाव घेतली.

यामध्ये दीड वर्षीय चिमुकल्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. या घटनेतील कुटुंब दररोज प्लास्टिक टाकीमध्ये हिटर लावून अंघोळीसाठी जात होते. आज सकाळी देखील नेहमीप्रमाणे हिटर द्वारे पाणी गरम करत असताना अचानक स्फोट होऊन या गावातील धुरपता मुंडे, बालाजी मुंडे साहेबराव मुंडे यांच्या सह दीड वर्षीय गणराज मुंडे गंभीर जखमी झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे तीळ पिकाचे नुकसान

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT