Nanded Accident Saam Tv
महाराष्ट्र

Nanded Accident: कार-ट्रॅक्टरचा भिषण अपघात; दोन पोलिस ठार, दोन पोलीस जखमी

दिपक देवानंद जाधव आणि ईश्वर सूदाम राठोड असं अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत तर प्रतिशे इटग्याळकर आणि सदानंद सपकाळ हे जखमी झाले असून यांना महामार्ग पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

संतोष जोशी साम टीव्ही न्यूज नांदेड

नांदेड - कार आणि ट्रॅक्टरच्या धडकेत दोन पोलीस कर्मचारी ठार तर दोन पोलीस जखमी झाले आहेत. काल रात्री भोकर - नांदेड (Nanded) महामार्गावर खरबी येथे ही दुर्दैवी घटना घडली आहे. हा अपघात एवढा भिषण होता की कार मध्ये बसलेले दोन पोलीस कर्मचारी जागीच ठार झाले. दिपक देवानंद जाधव आणि ईश्वर सूदाम राठोड असं अपघातात मृत झालेल्यांची नावे आहेत तर प्रतिशे इटग्याळकर आणि सदानंद सपकाळ हे जखमी झाले असून यांना महामार्ग पोलिसांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले. (Nanded Accident News)

हे देखील पहा -

चार पोलीस (Police) कर्मचारी ही भोकर येथील पोलीस मित्राच्या घरी जेवण्यासाठी गेले होते. जेवन करुन रात्री नांदेडकडे परतत असताना खरबी जवळ कारने एका उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा भिषण अपघात झाला. या प्रकरणी रात्री उशिरा ट्रॅक्टर चालका विरोधात बारड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT