Accident News राजेश भोस्तेकर
महाराष्ट्र

मुबंई गोवा महामार्गावर भीषण अपघात; मालवाहू कंटनेर थेट घुसला घरात

कंटेनरचा ताबा सुटल्याने मार्गालगत असलेल्या वस्तीमधील चेतन मेहता व प्रवीण भानत यांच्या घरात कंटेनर घुसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजेश भोस्तेकर

रायगड - जिल्ह्यातील मुबंई (Mumbai) गोवा महामार्गावर कोलाड खांब येते एका घरात भरधाव मालवाहू कंटनेर घुसल्याने मोठा अपघात (Accident) घडला असून या घटनेत घरातील कुटूंब थोडक्यात बचावले आहे. काल 3 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. मुबंई गोवा (Goa) महामार्गावर माणगाव कोलाडकडून नागोठणेच्या दिशेने जाणारा भरधाव मालवाहू कंटनेर चालकाचा खड्यामूळे कंटेनर वरील ताबा सुटला. कंटेनरचा ताबा सुटल्याने मार्गालगत असलेल्या वस्तीमधील चेतन मेहता व प्रवीण भानत यांच्या घरात कंटेनर घुसला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

हे देखील पहा -

घरातील कुटूंब या अपघाताने थोडक्यात बचावले आहेत तर चालक गंभीर जखमी झाला आहे. नागोठणे ते कोलाड दरम्यान मोठ मोठे खड्डे असल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस घटनास्थळी पोहचले असून जखमी झालेल्या उपचारासाठी अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चालकाची अद्याप ओळख पटलेली नसल्याची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

Vastu Tips Of Furniture Placement: घरात फर्निचरची मांडणी करताना 5 महत्वाच्या वास्तू टिप्स

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम

Pune : पुण्यात रिलस्टारकडून तरुणावर कोयत्याने हल्ला, सुनेत्रा पवार अ‍ॅक्शन मोडवर; कारवाईचे आदेश

२५, ३० की ४०... घर खरेदी करण्याचं योग्य वय कोणतं? जाणून घ्या प्रॉपर्टी घेण्याची परफेक्ट वेळ

SCROLL FOR NEXT