बुलडाण्यात भीषण अपघात; वृद्ध महिलेचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी Saam Tv
महाराष्ट्र

बुलडाण्यात भीषण अपघात; वृद्ध महिलेचा मृत्यू, १८ प्रवासी जखमी

१८ पैकी 6 प्रवासी हे गंभीर जखमी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बुलडाणा - यवतमाळच्या Yavatmal बस डेपोतून आज 23 ऑगस्ट रोजी सकाळी औरंगाबादच्या Aurangabad दिशेने एसटी निघाली. या बसचा बुलडाणा Buldhana जिल्ह्यातील देऊळगाव राजा बायपासवर भीषण अपघात Accdient झाला. या एसटीमध्ये जवळपास २५ लोकं होते. एका ट्रकने या एसटी बसला ST Bus जोरदार धडक दिली. त्यामुळे बसच्या काही भागाचा अक्षरश: चक्काचूर झाल्याचे पहायला मिळाले. या अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

हे देखील पहा -

तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत या १८ पैकी ६ प्रवासी हे गंभीर जखमी झाले आहेत. संबंधित घटना दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या अपघाताचा आवाज इतका भीषण होता की आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. तसेच बसमधील नागरिकांना बाहेर काढायला सुरुवात केली. या भीषण अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी ६ प्रवासी हे गंभीर जखमी आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कॉक्रोच जनता पार्टीच्या अडचणी वाढणार? विदेशी फंडिंग ईडीकडून चौकशी सुरू, गृहराज्यमंत्र्यांची माहिती

Maharashtra News Live: रायगडच्या खारपाडा टोल नाक्यावर, मनसे कार्यकर्त्यांचा राडा

Jantar Mantar Viral Girl: 'आज माझा वाढदिवस आहे, मला माफ करा...'; वादग्रस्त विधानांनंतर अल्पवयीन मुलीची पहिली प्रतिक्रिया

CM टार्गेट, हनीट्रॅपमध्ये मंत्र्यांचा पोरगा,जंतर-मंतर आंदोलन; STF नं 'उधळला जैश-ए-मोहम्मदचा मोठा कट

How To Make Puffed Poori: हॉटेलसारख्या फुगलेल्या आणि मऊ पुरी बनवायच्या? फॉलो करा 'या' ७ सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT