Rahul Bajaj : देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिशा आणि मार्गदर्शन देणारं नेतृत्व हरपलं - गृहमंत्री SaamTvNews
महाराष्ट्र

Rahul Bajaj : देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिशा आणि मार्गदर्शन देणारं नेतृत्व हरपलं - गृहमंत्री

औद्योगिक क्षेत्राला दिशा आणि मार्गदर्शन देणारं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली.

रोहिदास गाडगे

शिरुर :- बजाज उद्योगसमूहाचे चेअरमन, प्रसिद्ध उद्योजक, पद्मभूषण राहुल बजाज (Rahul Bajaj) यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी अखेरच्या श्वास घेतला. मागील महिनाभरापासून बजाज यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनावर देशभरातुन विविध क्षेत्रातील मान्यवर शोक व्यक्त करत आहेत. (Home Minister Dilip Walse-Patil Pays Homage To Rahul Bajaj)

हे देखील पहा :

राहुल बजाज यांचे पार्थिव आज आकुर्डीतील बजाज कंपनीच्या आवारात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले असून ४.३० वाजता पुण्यातील (Pune) वैकुंठ स्मशानभूमीत (Vaikunth Smashanbhumi) त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दरम्यान, बजाज यांच्या निधनावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

देशातील आघाडीचा उद्योग समूह असलेल्या बजाज समूहाची धुरा तब्बल ४० वर्षे यशस्वीरित्या वाहणारे ज्येष्ठ उद्योगपती व बजाज समूहाचे माजी अध्यक्ष राहुल बजाज यांच्या निधनाने, देशाच्या औद्योगिक क्षेत्राला दिशा आणि मार्गदर्शन देणारं नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Dilip Walse-Patil) यांनी बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे. वळसे-पाटील आज शिरुर हवेली मतदारसंघात विविध विकास कामांच्या पाहणी दौऱ्यावर आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातून इलेक्ट्रिक गाडीने मुंबईच्या दिशेने रवाना

Axar Patel: अक्षर पटेलने केली मॅच फिक्सिंग? दिल्ली-पंजाब सामन्यात नेमकं झालं काय? वाचा

PM Modi Convoy Size : पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय, ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी

Maharashtra Monsoon Update : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५ दिवसात मान्सून दाखल होणार, वाचा नेमका अंदाज काय?

Gold Rate Today: दरवाढीचा भडका! चांदी ३० हजारांनी महागली, तर सोन्याच्या दरात आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ, वाचा लेटेस्ट दर

SCROLL FOR NEXT