Maharashtra Task Force for HMPV Google
महाराष्ट्र

HMPV चा महाराष्ट्रातही शिरकाव; राज्यात टास्क फोर्सची स्थापना

HMPV चा महाराष्ट्रातही शिरकाव झालाय. सरकारकडून राज्यात टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. व्हायरसचा शिरकाव झाल्याने पालकांना आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱा HMPV व्हायरस आता महाराष्ट्रात धडकलाय. नागपूरमध्ये या व्हायरसचे दोन रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे लहानगेच आहेत. त्यामुळे पालकांना आपल्या मुलांची अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. यामुळे मात्र राज्य सरकार अलर्ट मोडवर आलंय. यावरचाच हा विशेष रिपोर्ट.

चीनमध्ये धुमाकूळ घातलेल्या HMPV ने भारताच्या चिंता वाढवल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 8 रुग्ण आढळले असून या विषाणूचा महाराष्ट्रातही शिरकाव झालाय. नागपूरमध्ये 7 वर्षीय मुलगा आणि 13 वर्षीय मुलीला HMPV ची लागण झाल्याची माहिती समोर आलीय.. या पार्श्वभुमीवर सरकार अलर्ट मोडवर आलं असून जे. जे हॉस्पिटल्सच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळेंच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आलीय.

कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल आणि तमिळनाडू पाठोपाठ महाराष्ट्रातही या विषाणूने हातपाय पसरले आहेत. या विषाणूची लक्षणं काय आहेत? पाहूयात.

HMPV ची लक्षणं

सर्दी

खोकला

ताप

घसा खवखवणे

धाप लागणे

जुलाब

अंगावर पुरळ

कोरोना सदृश्य विषाणू महाराष्ट्रात धडकल्याने आता राज्यातील हॉस्पिटल्स या महासंकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. दुसरीकड् आरोग्य खात्याने नागरिकांसाठीही नियमावली जारी केलीय... HMPVपासून वाचण्यासाठी नेमकं काय टाळायला हवं? पाहूयात.

काय करू नये?

डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणं टाळा

कुणाशीही हस्तांदोलन करू नका

सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका

ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधं घेऊ नका

कोरोना संसर्गामुळे तब्बल साडेपाच लाख लोकांचा जीव गेला. त्यानंतर आता चीनमधून आलेल्या HMPV या नव्या विषाणू पासून लहान मुलं आणि वृद्धांना वाचवण्यासाठी प्रत्येकाने नियम पाळायला हवेत...अन्यथा कोरोना प्रमाणेच आताही HMPV मुळे अनेक कुटुंब उध्वस्त होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Maharashtra News Live Update: वर्ध्याच्या जळगाव परिसरात बिबट्याची दहशत; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

Politics: माजी मुख्यमंत्री राजकारणातून निवृत्ती घेणार? राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT