महाराष्ट्र

Accident: नांदेडमध्ये हिट अँड रन; टेम्पोच्या धडकेत वयोवृद्ध पती-पत्नी जागीच ठार, नागरिकांनी रोखला राष्ट्रीय महामार्ग

Nanded Accident: नांदेडमध्ये हिट अँड रनची घटना घडलीय. एका टेम्पो चालकाने वयोवृद्ध दाम्पत्याला धडक दिली असून यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय सूर्यवंशी, साम प्रतिनिधी

नांदेडमधील किनवट तालुक्यातील सावरगावात हिट अँड रची घटना घडलीय. शेताकडे जाणाऱ्या वयोवृद्ध एका जोडप्याला एका टेम्पोने धडक दिली असून यात या जोडप्याचा जागीच मृत्यू झालाय. दरम्यान धडक देणारा टेम्पो चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून फरार झालाय. आरोपीला अटक करण्यात यावी यासाठी वृद्ध जोडप्याच्या नातेवाईकांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करत आंदोलन केले आहे. आरोपीला पकडण्यात यावे यासाठी त्यांनी हे आंदोलन केले आहे.

या घटनेसंदर्भात प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात नांदेडच्या किनवट तालुक्यातील सावरगाव येथे झाला. या अपघातात दोन वयोवृद्ध पती-पत्नीचा मृत्यू झालाय. किनवट तालुक्यातील सावरगाव येथील नागोराव कुरुडे आणि त्यांची पत्नी सुल्याबाई कुरुडे हे आपल्या शेतीकडे पायी जात होते. पायी जात असताना पाठीमागून येणाऱ्या टेम्पोने या वृद्ध दाम्पत्याना जोराची धडक दिली.

या धडकेत दोघे पती, पत्नी जागीच ठार झाले. धडक देऊन टेम्पो चालक फरार झाला आहे.या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही,अशी भूमिका या मृतांच्या नातेवाईकांनी घेतली.

कॅनलमध्ये ट्रॅक्टर पलटी होऊन एक महिला ठार, एक गंभीर

ट्रॅक्टर कॅनॉलमध्ये पलटी होऊन झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना दोन ते तीन दिवसापूर्वी घडली होती. शेतातील सोयाबीनची रास ट्रॅक्टरमध्ये भरून घराकडे येत असताना ही अपघात झालाय. या अपघातात ट्रक्टरखाली सापडून टाकळी (ता. नायगाव) येथील दैवशाला गोविंद मोटरगे (वय ४०) ही महिला जागीच ठार झाली तर राजाबाई सायबु उसकुलवाड (वय ५०) ही महिला गंभीर जखमी झाली होती. अन्य तिघेजणही किरकोळ जखमी झालेत. ही घटना सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shampoo Tips: शॅम्पू करताना चुकूनही करू नका 'या' ७ चुका; केस होतील खराब, डॉक्टरांनी सांगितली योग्य पद्धत

Maharashtra News Live Update: MPSCने पुन्हा परीक्षा ढकलली; २५ ऑक्टोबरची गट-क पूर्व परीक्षा आता ३ जानेवारीला

Akash Dalvi : राजकीय वातावरण तापलं! भाजपच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Walking After Dinner Benefits: जेवणानंतर १५ मिनिटे चालण्याची सवय लावा; शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

Sleeping Issues : रात्रभर झोपूनही दिवसा झोप येते? 'या' गंभीर आजाराचे आहे लक्षण, वेळीच व्हा सावध!

SCROLL FOR NEXT