हिंगोली जिल्हा परिषद शाळांमधील पोषण आहार स्टिंग ऑपरेशन
हिंगोली जिल्ह्यातील औंढा आणि सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्टिंग ऑपरेशन
पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत अधिकृत तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.
संदीप नांगरे, साम प्रतिनिधी
सध्या राज्यभर तुकाराम मुंढे आयुक्त असलेल्या अन्न औषध प्रशासनाकडून विविध हॉटेल्स खाजगी आस्थापना आणि भोजनालयावर छापे टाकण्यात येत आहेत. स्वच्छता यासह भेसळ करणाऱ्या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येत आहे. मात्र यामध्ये शासकीय आस्थापनांचा समावेश का नाही असा प्रश्न न्यायालयासह अनेकांना पडला होता त्यातच आता हिंगोलीत ठाकरेंच्या शिवसेनेने हिंगोली जिल्ह्यातील औंढा व सेनगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्टिंग ऑपरेशन केलं. यात शालेय पोषण आहार उत्कृष्ट दर्जाचा विद्यार्थ्यांना दिला जात असल्याचा प्रकार समोर आला.
ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी यासंदर्भात मोठा आरोप केला आहे, शिवसैनिकांनी हातात मोबाईल घेत विविध शाळांना भेटी दिली आहेत. या शाळांमध्ये हा सगळा प्रकार आढळल्याच देशमुख म्हणाले. या शाळा नेमक्या कोणत्या आहेत याची माहिती अद्याप मिळू शकली नसून आपल्याला शिक्षकांनी शाळेचे नाव घेऊ नका अशी विनंती केली असल्याचे देशमुख म्हणाले.
चिमुकल्यांना शालेय पोषण आहार निकृष्ट दर्जाचा देऊन त्यांच्या आरोग्याशी खेळ सुरू असताना राजकीय पक्षांचे नेते व सत्तेतील लोकप्रतिनिधी शिक्षकांनी या संदर्भात आवाज उठवला तर दबाव टाकत असल्याचं शिक्षकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणाले. या विरोधात लवकरच शिवसेनेकडून जिल्हाभरात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या धक्कादायक प्रकारानंतर तुकाराम मुंढे यांच्या विभागाचे अधिकारी तातडीने कार्यवाही करणार का हे पहावे लागेल.
अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला मोर्चा आता शालेय विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराकडे वळवलाय. विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि दर्जेदार आहार मिळावा यासाठी Safe Food for Every School Child in Maharashtra या राज्यव्यापी आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सोमवारी १७ ऑगस्ट रोजी राज्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.