Hingoli Crime Saam Tv
महाराष्ट्र

शिक्षकी पेशाला काळिमा ! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

हिंगोली जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना

संदीप नागरे

हिंगोली : शिक्षक हा केवळ विद्यार्थीच नाही तर समाज घडवतो, असे सांगितले जाते. परंतु, हिंगोली जिल्ह्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना घडली आहे. या शिक्षकाचे (teacher) महिलेसोबत प्रेम संबंध होते. शिक्षकाने फ्लॅट घेऊन देतो, घर घेऊन देतो आणि शेती (Agriculture) नावावर करून देतो म्हणत बलात्कार केल्याचे महिलेने सांगितले आहे. तसेच आंघोळ करतानाचे फोटो (Photo) काढून त्याद्वारे तिला ब्लॅकमेल करुन, सतत बलात्कार (sexual assualt) केल्याची घटना उघडकीस आली आहे.

हे देखील पहा-

हिंगोलीतील (Hingoli) सेनगाव येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस (Police) आरोपीचा शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सेनगाव इथला रहिवासी असलेला शिक्षक मारोती कोटकर याने संबंधित महिलेबरोबर भाऊ असल्याचे सांगून जवळीक निर्माण केली होती. या शिक्षकाने महिलेचा पती घरी नसल्याची आणि ती घरात एकटीच असल्याची संधी साधत, तिचे आंघोळ करतानाचे फोटो काढले.

हे फोटो व्हायरल (Viral) करण्याची धमकी देत शिक्षकाने महिलेवर वारंवार बलात्कार केला आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भंडारा भीषण अपघातात आणखी एका महिलेचा मृत्यू, मृतकाचा आकडा पोहोचला ९ वर

Kidney Stone: टोमॅटो खाल्ल्याने किडनीमध्ये स्टोन होतो? डॉक्टरांनी सांगितलेलं सत्य वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

Gold Price Today: खुशखबर! ऐन गणेशोत्सवात सोन्याच्या दरात मोठी घसरण! 18K, 22K आणि 24K सोन्याचे आजचे दर वाचा

Garuda Purana: मृत्यूनंतर आत्म्याला नवीन शरीर किती दिवसांनी मिळतं? गरुड पुराणात दिलीये माहिती

Bipasha Basu: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रोटीन पावडरमध्ये अळ्या; तुकाराम मुंडेंना टॅग करत केली कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT