Hingoli Political News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Political News: स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्याने रस्त्यावर उडवल्या नोटा; कारण काय?, पाहा VIDEO

Swabhimani officer blew the notes: राग व्यक्त करत स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चक्क टोपलंभर नोटा उधळल्या आहेत.

संदिप नागरे

Swabhimani Shetkari Saghtana: हिंगोलीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमीका घेतली आहे. शेतकऱ्यांना पेस्टिसाइड कंपनी चुकीची औषधे देत असल्याने स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. यावेळी राग व्यक्त करत स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी रस्त्यावर चक्क नोटा उधळल्या आहेत.

जीव देण्याशिवाय पर्याय नाही

कृषी विभागाविरोधात हे अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. कंपनी शेतकऱ्यांना चुकीचे औषध देत असल्याने पिकांवर त्याचा मोठा परिणाम होत आहे. राज्याचे कृषी मंत्री आणि हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा जिल्हा असलेल्या ठिकाणी सदर आंदोलन सुरु आहे.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी

स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी नोटा उधळतानाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये स्वाभिमानीचे एक पदाधिकारी रस्त्यावर नोटा उधळत आहेत. यावेळी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली आहे. कंपन्या शेतकऱ्यांना जैविक औषध म्हणून घातक औषध देतात, असा आरोप यावेळी करण्यात आलाय.

हिंगोली जिल्ह्यात ७०० हून अधिक कंपन्या आहेत. या कंपन्या औषधांमध्ये घातक घटक मिसळून त्याची विक्री करत आहेत. गेल्या दोन- तीन महिन्यांपासून जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना याचे निवेदन देऊनही यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असे आंदोलकांचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT