Hingoli Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : अंगदुखीवर आयुर्वेदिक उपचार घेतले अन् घडला भलताच प्रकार; उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल

Hingoli Wasmat News : अंगदुखीवर गोळ्या देत पाच तासात अंगदुखीचा त्रास थांबेल असे आश्वासन रुग्णांना देण्यात आले. यामुळे गावातील काहीजण निकम यांच्याकडे गेले यावेळी त्याने काही औषधी रुग्णांना दिली

संदीप नागरे

हिंगोली : अंगदुखीचा त्रास जाणवत असल्याने त्यावर आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी एका आयुर्वेदिक डॉक्टराकडे काहीजण गेले. या डॉक्टराने दिलेल्या गोळ्या घेतल्यानंतर नागरिकांना वेगळाच त्रास जाणवू लागला होता. गोळ्या सेवन केल्याने शरीरावर जखमा झाल्याचा प्रकार हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हयात नगर भागात घडला आहे. या नागरिकांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात आर्वी निकम हा आयुवेदिक उपचार करणारा वैद्य आला होता. निकम हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील रहिवासी आहे. अंगदुखीवर गोळ्या देत पाच तासात अंगदुखीचा त्रास थांबेल असे आश्वासन आर्वी निकम यांच्याकडून रुग्णांना देण्यात येत होते. यामुळे अंगदुखीचा त्रास होत असलेले गावातील काहीजण निकम यांच्याकडे गेले होते. यावेळी त्याने काही औषधी रुग्णांना दिली. 

शरीरावर झाल्या जखमा 

अंगदुखीसाठी आयुर्वेदिक गोळ्या असल्याने यावर नागरिकांनी विश्वास ठेवला. पाच तासात अंगदुखी थांबेल असे सांगण्यात आल्याने नागरिकांनी गोळ्या घेतल्या. मात्र या गोळ्या घेणे रुग्णांच्या चांगलेच अंगलट आले आहे. कारण गोळ्या सेवन केल्यानंतर काही तासांनी या नागरिकांना अचानक शरीरावर जखमा व्हायला सुरुवात झाली आहे. दरम्यान या धक्कादायक प्रकारानंतर अनेक नागरिक शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई 

आयुर्वेदिक गोळ्या घेतल्याने अंगावर जखमा झाल्याची माहिती मिळाली. जडीबुटी देणारा डॉक्टर उपचार करत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार जिल्ह्यात जे कोणी बोगस डॉक्टर तसेच अवैध वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. तालुकास्तरीय समितीमार्फत हि कारवाई करण्यात येणार असल्याचे हिंगोलीचे जिल्हा आरोग्य अधिकारी कैलाश शेळके यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Covid-19 Death : भारतात पुन्हा कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची एन्ट्री, ४६ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

Maharashtra News Live Update: नगरसेवक रमेश म्हात्रेला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

SCROLL FOR NEXT