Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli : व्यापाऱ्यांकडून मापात पाप; १४ किलो हळदीतील ४ किलोचा झोल करत शेतकऱ्यांची फसवणूक

Hingoli News: हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या हळद काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. हळदीच्या शेतात कोच्या नावाची हळद ही महागडी विक्री होते. या कोचा हळदीचा भाव प्रति किलो २३० रुपये सुरू आहे

संदीप नागरे

हिंगोली : शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. मापात पाप करून व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी गावातील हा गंभीर प्रकार घडला आहे. १४ किलो हळदी मागे तब्बल चार किलो हळद मापात पाप करून व्यापारी चोरी करत असल्याचे पुढे आल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

हिंगोली जिल्ह्यात सध्या शेतकऱ्यांच्या हळद काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. हळदीच्या शेतात कोच्या नावाची हळद ही महागडी विक्री होते. या कोचा हळदीचा भाव प्रति किलो २३० रुपये सुरू आहे. हीच हळद खरेदी करण्यासाठी दुचाकीवर अनेक व्यापारी शेतकऱ्याच्या दारावर येत आहेत. मात्र दारावर हळद खरेदीसाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. 

मोजमापात शेतकऱ्याला आला संशय 

हिंगोली जिल्ह्यातील वटकळी गावातील शेतकरी सोपान डाखोरे यांच्या शेतात उत्पादित झालेली महागडी कोचा हळद गावात आलेल्या एका व्यापाऱ्याने खरेदी केली. मात्र ही हळद खरेदी करताना चक्क १४ किलो हळद ११ किलो असल्याचे या व्यापाऱ्याने शेतकऱ्याला सांगितले. त्याचे दाम देखील दिले. मात्र या व्यापाऱ्याच्या मोजमाप काट्याचा संशय आल्याने शेतकरी सोपान डाखोरे यांनी दुसऱ्या ठिकाणी या हळदीचे माप केले. 

तीन किलोची आढळली तफावत 

तिथे मात्र तब्बल तीन किलोची तफावत आढळली, तीन किलो हळदीचे ७०० रुपये व्यापारी मापात पाप करून लुटत असल्याचे शेतकऱ्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर शेतकरी डाखोरे चांगलेच संतप्त झाले. त्यांनी गावातील सरपंचासह पोलीस पाटील यांना बोलावत या व्यापाऱ्याला धडा शिकवावा अशी मागणी केली. या सगळ्या प्रकारानंतर व्यापाऱ्याने चूक झाली; असे म्हणत प्रकरण मिटून टाका अशी विनंती केली आणि त्यानंतर गावातून पळ काढला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

Solapur Crime: सूनेमुळे सासऱ्यानं संपवलं जीवन; तपासात समोर आलं धक्कादायक कारण

Beed: बीडमध्ये गॅस टंचाईत सिलिंडरचा काळाबाजार, सिलिंडरने भरलेले ३ ट्रक लपवून ठेवले

Maharashtra Live News Update: चाकण औद्योगिक क्षेत्रात फटका; 30% कंपन्या ठप्प होण्याच्या मार्गावर

Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

SCROLL FOR NEXT