Hingoli Zp Saam tv
महाराष्ट्र

Zp School : जिल्हा परिषद शाळेतील चाललंय काय?; शिक्षकाकडून विद्यार्थ्यांना चुकीचं ज्ञान, शिक्षकाचे थेट निलंबन

Hingoli News : खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी इथपासून सुरवात करावी लागत असते. तर डिजिटल क्लासरूम करत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे

संदीप नागरे

हिंगोली : जिल्हा परिषद शाळांची अवस्था अगदीच दयनीय असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या शाळांमधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा शासनाचा प्रयत्न असताना हिंगोलीच्या जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पेडगाव जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकाकडून शाळेतील विद्यार्थ्यांना चुकीचे ज्ञान दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या चौकशीत हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषद सीईओंनी शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे. 

हिंगोलीच्या पेडगाव जिल्हा परिषद शाळेत हा प्रकार समोर आला आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये गरिबांची मुले शिक्षणासाठी येत असतात. खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढावी इथपासून सुरवात करावी लागत असते. तर डिजिटल क्लासरूम करत नवीन तंत्रज्ञानाद्वारे शिक्षणाचे धडे देण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशात शिक्षकच चुकीचे ज्ञान देत असतील तर या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रगती कशी होणार? असे बोलले जात आहे. 

शाळा तपासणीदरम्यान समोर आला प्रकार  

दरम्यान हिंगोलीच्या पेडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत असलेल्ये चिमुकल्यांना चुकीचे धडे देणारा हा प्रकार पुढे आला आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आदेशानंतर मिशन निपुण अंतर्गत शाळेत तपासणी करण्यात येत आहे. तपासणी करण्यासाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हि बाब निदर्शनास आली आहे. या प्रकाराबाबत प्रशासनाला माहिती देण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीईओ स्नेहा भोसले यांनी विद्यार्थ्यांना चुकीचे धडे देणाऱ्या अरुणनाना कांबळे या शिक्षकावचे निलंबन केलं आहे. 

तीन विषयांचे चुकीचे ज्ञान 

धक्कादायक म्हणजे शिक्षक कांबळे हे विद्यार्थ्यांना शिकवत असलेल्या मराठी, इंग्रजी, गणित या सगळ्याच विषयाचे चुकीचे धडे देत असल्याचे तपासणी दरम्यान स्पष्ट झाल आहे. त्यामुळे पुन्हा एकदा जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या गरिबांच्या चिमुकल्यांना दर्जेदार शिक्षण तर सोडाच, पण योग्य शिक्षणाचे धडे देखील मिळत नसल्याचं ढळढळीत वास्तव या प्रकारामुळे समोर आले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT