Hingoli Medical Collage Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Medical Collage : हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय होणार सुरु; शंभर विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश

Hingoli News : राज्य सरकारने हिंगोलीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मागील वर्षीच मान्यता दिली होती.

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे. गतवर्षी मान्यता मिळाल्यानंतर आता हे महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून यात शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. 

राज्य सरकारने हिंगोलीत (Hingoli) वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी मागील वर्षीच मान्यता दिली होती. मात्र प्रत्यक्षात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. यामुळे महाविद्यालय सुरु करून यात प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी हिंगोलीकरांनी सरकारच्या विरोधात आंदोलन करत पाठपुरावा केला होता. त्यानंतर मात्र आता वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. 

१०० विद्यार्थ्यांना प्रवेश 

लवकरच हिंगोली मध्ये वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. महाविद्यातील प्रवेश प्रक्रिया यंदापासून सुरु करण्यात येणार असून यावर्षीपासून शंभर (Student) विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

Pune Fort : पुण्याजवळ दडलाय इतिहासाचा खजिना! दोन डोंगरांवर वसलाय भव्य किल्ला

SCROLL FOR NEXT