Hingoli Accident News Saam TV
महाराष्ट्र

Hingoli News : हिंगोली-रिसोड राज्य मार्गावर भीषण अपघात; देवदर्शनाहून परतणाऱ्या पती-पत्नीचा जागीच मृत्यू

Hingoli Accident News : नवरात्र उत्सवानिमित्त मुंडे हे दोघे पती-पत्नी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरुन आले होते.

Satish Daud

संदीप नागरे, साम टीव्ही

हिंगोली : नवरात्री उत्सवानिमित्त देवदर्शन करुन दुचाकीवरून घरी परतणाऱ्या पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाला. हिंगोली-रिसोड राज्य मार्गावरील सेनगावजवळील गुरुवारी (ता. १०) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. गणेश मुंडे आणि सविता गणेश मुंडे अशी पती-पत्नीची नावे आहेत. मृत दाम्पत्य सेनेगाव तालुक्यातील हिवरखेडा गावचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवरात्र उत्सवानिमित्त मुंडे हे दोघे पती-पत्नी देवीच्या दर्शनासाठी दुचाकीवरुन आले होते. दर्शन घेऊन गावाकडे परत जात असताना सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तळणी फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रकला त्यांच्या दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला. अपघातात गणेश आणि सविता दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. स्थानिकांनी या अपघाताची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

मुंडे दाम्पत्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. ऐन नवरात्री उत्सवात पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे प्रक्रिया सुरु होती.

अहमदनगरमध्ये शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

शाळा सुटल्यानंतर मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना अहिल्यानगर शहरातील भिंगार परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली. अमजद जावेद शेख (वय 13) आणि साद अन्सारी (वय 15) अशी मृत मुलांची नावे आहेत. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले असून अकास्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT