Hingoli Grampanchayat News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News: ग्रामपंचायत कार्यालय पेटून देत ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला; ग्रामसेवकाचेच कृत्य असल्याचा नागरिकांचा आरोप

Hingoli News : ग्रामपंचायत कार्यालय पेटून देत ग्रामसेवकावर जीवघेणा हल्ला; ग्रामसेवकाचेच कृत्य असल्याचा नागरिकांचा आरोप

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा गावात ग्रामपंचायत कार्यालय पेटून देत ग्रामसेवकावर (Hingoli) जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या घटनेत ग्रामसेवक राजेंद्र बोर्डे गंभीर जखमी झाले असून ग्रामपंचायतीमधील (Grampanchayat) दस्तऐवज जळून खाक झाले आहेत. (Latest Marathi News)

साखरा गावात ग्रामपंचायतमार्फत वित्त आयोगाच्या निधीमधून करण्यात आलेल्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर काही दिवसांपूर्वी या गावातील नागरिकांनी आंदोलन केले होते. मात्र प्रशासन ग्रामसेवकाच्या विरोधात कोणतीही कार्यवाही करत नसल्याने हा वाद झाल्याचे देखील गावातील नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र या घटनेप्रकरणी सेनगाव पोलीस स्थानकात अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याचे (Police) पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान ग्रामपंचायत कार्यालय जाळून ग्रामसेवकावर हल्ला झाला आहे. जखमी ग्रामसेवकावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेत साखरा गावातील ग्रामपंचायत मधील अनेक जुने दस्तऐवज जळून खाक झाले आहेत.

ग्रामसेवकाने स्वतःच कट रचल्याचा आरोप 

ग्रामसेवकाने (Gram Sevak) स्वतःच कट कारस्थान रचून घडवली असून, भ्रष्टाचाराचे प्रकरण दाबण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय जाळून टाकल्याचा आरोप या गावातील नागरिकांनी केला आहे. तसेच या संपूर्ण घटनेची चौकशी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे, 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Inheritance Rules: मृत्यूपत्र न करता वडिलांचं निधन झाल्यास संपत्तीवर पहिला हक्क कोणाचा? मुलाचा की मुलीचा

Maharashtra News Live Update: उल्हासनगरमध्ये भाजपा शिवसेने विरोधात आक्रमक

Ghee Benefits: रोज रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्याने शरीरात होतात ५ चमत्कारिक बदल

Government Pension Yojana: छोट्या व्यापाऱ्यांसाठी केंद्राची पेन्शन योजना; वयाच्या 60 नंतर मिळणार दरमहा ₹3,000 पेन्शन

मोठी बातमी! महायुतीचा पुण्याचा तिढा सुटला, जागावाटपाचा नवा फॉर्म्युलाही समोर, राष्ट्रवादी-शिवसेनेला कोणती जागा?

SCROLL FOR NEXT