Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविले; बिहारकडे जाताना पोलिसांनी घेतले ताब्यात

Hingoli News : पालकांनी शोध घेतल्यानंतर ती सापडून न आल्याने मुलगी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसात दिली होती

संदीप नागरे

हिंगोली : मुलींना आमिष दाखवून पळवून नेण्याचे तसेच अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच हिंगोलीतील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले जात होते. मात्र तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या सात तासातच बिहारी बाबुला ताब्यात घेतले आहे.

हिंगोली (Hingoli) शहरातील अल्पवयीन मुलगी आज सकाळपासून बेपत्ता झाली होती. पालकांनी शोध घेतल्यानंतर ती सापडून न आल्याने मुलगी घरातून बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी पोलिसात दिली होती. दरम्यान या गुन्ह्याचा तपास करताना या अल्पवयीन मुलीला एका बिहारी व्यक्तीने पळून नेले असून यवतमाळमार्गे तो बिहारला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलीस (Police) त्याच्या मागावर लागले होते. 

यवतमाळ रेल्वे स्टेशनवरून घेतले ताब्यात 

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी यवतमाळ रेल्वे स्थानकावर बिहारी बाबूसह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या आई- वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT