Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : बंद घरे, दुकाने फोडली; दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार

Hingoli News : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगावमध्ये घडला आहे. भाऊबीजेच्या मध्यरात्री चोरट्यांनी २ किराणा दुकानासह चार बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली आहे

संदीप नागरे

हिंगोली : दिवाळी उत्सव साजरा झाला असून दिवाळीच्या सुट्या व भाऊबीजनिमित्ताने अनेकजण घरी जात असतात. यामुळे घरे बंद आहेत. याचाच फायदा चोरट्यानी घेतला असून हिंगोली जिल्ह्यात दिवाळी सणात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. भाऊबीजच्या रात्रीच बंद घरे व दुकाने फोडून चोरट्यानी दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली आहे.  

दिवाळीच्या सुटीनिमित्ताने बाहेरगावी किंवा दिवाळी अनेकजण घरी जात असतात. तर भाऊबीजेला सासुरवासिनी महिला माहेरी जात असतात. यामुळे घर बंद असतात. याचा फायदा चोरटे घेत असतात. असाच प्रकार (Hingoli) हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील आजेगावमध्ये घडला आहे. भाऊबीजेच्या मध्यरात्री चोरट्यांनी २ किराणा दुकानासह चार बंद घराचे कुलूप तोडून चोरी केली आहे. चोरटयांनी रोख रक्कम व सोने- चांदीचे दागिने लंपास केले आहेत. रात्रीच्या वेळी चोरी करताना हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. 

कष्टाची कमाई गेल्याने महिलेने फोडला हंबरडा 

दरम्यान गावात झालेल्या चोरीच्या घटनेबाबत पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली होती. गोरेगाव पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून या चोरट्याचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान काबाडकष्ट करून कमावलेल्या पैशातून मिळवलेले लाखो रुपयांचे दागिने चोरी गेल्याने आजेगावमधील एका महिलेने पोलिसांच्या पुढेच हंबरडा फोडला होता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी जोरदार राजकीय हालचाली; संसदेचे विशेष अधिवेशन बोलावणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT