Hingoli News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli News : वंचितच्या उमेदवारावर हल्ला; आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी जमाव पोलीस स्थानकात

Hingoli News : मस्के यांच्यावर रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला करत त्यांची गाडी फोडली होती

संदीप नागरे

हिंगोली : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर मध्यरात्री हल्ला झाला. या घटनेनंतर समर्थक व कार्यकर्त्यांचा जमाव कळमनुरी पोलीस स्थानकासमोर येत आरोपीला अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंगोलीच्या (Hingoli News) कळमनुरी विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर रात्री अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक करत त्यांच्यावर हल्ला करत त्यांची गाडी फोडली होती. या हल्ल्यात मस्के हे जखमी झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. मात्र आता मस्के यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा म्हणत कळमनुरी पोलीस (Police) स्थानकात मोठा जमाव जमला आहे. 

पोलीस स्थानकासमोर गोंधळ 

डॉ. दिलीप म्हस्के यांच्यावर हल्ला झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते व समर्थक आक्रमक झाले आहेत. कळमनुरी पोलीस स्थानकाच्या पुढे मोठा जमाव असून हल्ला करणाऱ्या आरोपींना गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray Video: सुवर्णक्षण! हाच तो क्षण, ज्याची लाखो कार्यकर्ते वाट पाहत होती, पाहा व्हिडिओ

Rice Cooking Tips: भात पातेल्यात शिजवावा की कुकरमध्ये? वाचा फायदे-तोटे

Marathi bhasha Vijay Live Updates : कोणाची माय व्यायली त्यांनी मुंबईला हात लावून दाखवावा - राज ठाकरेंचा इशारा

Karnataka Hill Station: ट्रेकिंग अन् नयनरम्य दृश्य! कर्नाटकातील 'या' हिल स्टेशनला नक्की भेट द्या

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

SCROLL FOR NEXT