Hingoli News
Hingoli News  Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli News: अरे देवा! डब्बा उघडून पाहताच चोरट्यांचे डोळे फिरले, नेमकं काय घडलं पुढं...

संदीप नागरे

Hingoli News: तुम्ही अनेकदा चोरीच्या घटनांमध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न फसला चोरटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले अशा अनेक बातम्या ऐकल्या असतील, मात्र हिंगोलीत सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या चोरट्यांची जी फजिती झाली ती कदाचित पहिलीच घटना असावी. या घटनेत दोन दिवसांपासून दरोड्याचा प्लॅन तयार करणाऱ्या चोरट्यांच्या हातात सोन्या-चांदीच्या डब्या ऐवजी चक्क जेवणाचा डब्बा हाती लागला आणि हे चोरटेही पोलीस कोठडीत गेले. (Latest Marathi News)

चोरट्यांनी 48 तास सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून दरोडा तर टाकला मात्र यांच्या हातात दागिन्यांचा डब्बा पडण्या ऐवजी चक्क जेवणाचा डब्बा लागल्याने या चोरट्यांची मोठी पंचाईत झाली, जेवणाचा डब्बा हाती लागल्याचे समजताच यातील एका हुशार चोरट्याने पुन्हा आपला मोर्चा दागिन्यांचा डब्बा लुटण्यासाठी वापस वळविला आणि सगळाच कार्यक्रम फसला.

हिंगोली (Hingoli) तालुक्यातील सिरसम येथे सोन्या चांदीचा व्यापार करणारे अभिजीत उदावंत नेहमीप्रमाणे आपली दुकान बंद करून हिंगोली कडे निघाले. बासंबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या जोडतळा गावाजवळ येताच त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या चोरट्यांनी त्यांची दुचाकी अडवत अभिजीत यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकली.

काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी अभिजीत यांना मारहाण करून त्यांच्या जवळ असलेला सोन्या चांदीचा डब्बा पळविला मात्र डोळ्यात मिरची पूड गेल्याने. जोरजोरात ओरडणाऱ्या अभिजीत यांच्या कडे रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली. चोरटे माझा डब्बा घेऊन पळाले असे अभिजीत यांनी मदत करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सांगितले. (Hingoli News)

मात्र तोपर्यंत चोरट्यांना आपल्या हाती सोन्या-चांदीच्या डब्या ऐवजी जेवणाचा डब्बा लागल्याची खात्री पटली आणि चोरट्यांनी पुन्हा अभिजीत यांच्या जवळील सोन्या चांदीचा डब्बा हिसकावण्यासाठी आपला मोर्चा वळविला.

यातील एक चोरटा मात्र हुशार निघाला तिकडे लोक जमा झालेत लवकर पळा असे तो चोरटा दोन चोरट्यांना म्हणाला, मात्र एवढे कष्ट करून उपयोग काय, असे सांगत या चोरट्यांनी सहकारी चोरट्याचे न ऐकता पुन्हा दागिने लुटण्यासाठी धाव घेतली आणि हे चोरटे परिसरातील नागरिकांच्या तावडी सापडले.

ग्रामस्थांनी चोरट्यांना पकडून याची माहिती पोलिसांना दिली.पोलिसांनी या चोरट्यांना ताब्यात घेत अटक केली आहे, त्यांच्याकडून जेवणाचा डब्बा देखील जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरट्यांमध्ये राजू पवार व तोफिक शेख अशी या चोरट्यांची नावे आहेत हे दोघे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

या चोरट्यांनी 48 तासापासून या सोन्या-चांदीच्या व्यापाऱ्यावर पाळत ठेवून चोरीचा प्लॅन तयार केला होता. मात्र हा प्लॅन फसला आणि हे चोरटे पोलिसांच्या कोठडीत बंद झाले आहेत. आता पोलिसांचं एक पथक एका चोरट्याच्या शोधासाठी देखील रवाना झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed News: मोठी बातमी! निवडणुकीआधी बीडमध्ये सापडलं पैशाचं घबाड, कारमधून तब्बल १ कोटींची रोकड जप्त

Weather Forecast: विदर्भ तापला, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा; सोमवारपासून पुन्हा कोसळणार पाऊस

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

SCROLL FOR NEXT