Hingoli, zilla parishad school,  saam tv news
महाराष्ट्र

Zilla Parishad School : गुरुजी तुमचं हे वागणं बरं नव्हं! आक्रमक ग्रामस्थांनी शाळेला ठाेकले टाळे (पाहा व्हिडिओ)

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज ग्रामस्थ आक्रमक झाले हाेते.

संदीप नागरे

Hingoli : खासगी शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धांमुळे जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थी मिळणे कठीणहून जाते. तरीही बहुतांश जिल्ह्यात पालक त्यांच्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत माेठ्या विश्वासाने दाखल करतात. परंतु काही शिक्षकांच्या बेजबाबदारपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान हाेत आहे असे चित्र असल्याचे आज हिंगाेली जिल्ह्यात समाेर आले.

हिंगोलीच्या इसापूर गावांत जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेतील शिक्षक उशिरा येत असल्याने विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी आज जिल्हा परिषद शाळेस टाळे ठाेकले. तसेच शिक्षकांच्या बेजबाबदारपणाचा निषेध नाेंदविला. (Maharashtra News)

इसापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असून शेकडो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. ग्रामस्थांचे म्हणण्याप्रमाणे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी एकूण आठ शिक्षकांची (teachers) आवश्यकता असताना या शाळेत सात शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.

ज्या शिक्षकांची नियुक्ती आहे. ते शिक्षक दररोज शाळेत उशिरा येत असल्याची तक्रार वारंवार विद्यार्थी पालकांकडे करीत हाेते. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने आज ग्रामस्थ आक्रमक झाले हाेते. त्यांनी थेट शाळेला टाळे ठाेकले. अचानक झालेल्या या प्रकरामुळे उपस्थित असलेले काही शिक्षक गाेंधळून गेले. परंतु ग्रामस्थांच्या त्राग्यापुढे त्यांचे काही चालले नाही.

ग्रामस्थांनी साम टीव्हीशी बाेलताना शाळेच्या मुख्याध्यापकांसह शिक्षण विभागाला आम्ही वेळोवेळी विनंती केली मात्र तरी देखील शिक्षक शाळेत उशिरा येत असल्याने आज आ्म्हांला नाईलाजास्तव शाळेला (school) कुलुप लावावे लागले आहे. आम्ही मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे गावकऱ्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT