Hingoli Crime Saam Tv News
महाराष्ट्र

लेकीचा लग्नास नकार, वडिलांनी झोपेतच मुलीला संपवलं; नंतर स्वत: नस कापली; हिंगोलीत खळबळ

Shocking Hingoli Crime: हिंगोलीत बापानं लेकीचा खून करून स्वतःलाही संपवलं. लग्न नाकारल्यामुळे वडिलांनी लेकीला ठार मारलं. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

  • हिंगोलीत बापानं लेकीचा खून करून स्वतःलाही संपवलं.

  • लग्न नाकारल्यामुळे वडिलांनी लेकीला ठार मारलं.

  • खून केल्यानंतर वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

  • या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हिंगोलीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बापानं पोटच्या लेकीची हत्या केली. नंतर स्वत:ला संपवलं. या घटनेची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तपासाची चक्र फिरवली. या दोन्ही मृत्यूंबाबत अनेत तर्कवितर्क लावण्यात येत होते. मात्र, आता या मृत्यूचं गूढ उकलले आहे. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हिंगोली शहरातील मस्तान शहा नगर भागात काल सकाळी बाप लेकीचा मृत्यू झाल्याची माहिती उघडकीस आली. वडील गळफास घेतलेल्या अवस्थेत होते. तर, त्यांची मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. या घटनेची माहिती परिसरात पसरताच खळबळ उडाली होती. हिंगोली पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तसेच दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. पोलिसांना या घटनेच्या तपासाबाबत धक्कादायक मिळाली. लेकीनं लग्नासाठी नात्यातील मुलाला नकार दिला होता. याच गोष्टीचा राग वडिलांच्या मनात होता. या कारणावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं.

याच कारणामुळे वडिलांनी लेकीला ठार मारण्याचे ठरवले. घटनेच्या दिवशी लेक झोपली होती. झोपलेल्या अवस्थेत आरोपी वडिलांनी तिचा गळा दाबला. त्यानंतर लेकीचा खून केल्यानंतर वडिलांना पश्चाताप झाला. त्यांनी स्वत:च्या हाताची नस कापली. तसेच घरात गळफास लावून आयुष्य संपवलं. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांना कळवण्यात आले.

हिंगोली पोलिसांच्या तपासात ही धक्कादायक बाब उघडकीस आली. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL match fixing : गुजरात-राजस्थान सामन्यात झाली फिक्सिंग ? त्या एका व्हिडिओने उडाली खळबळ, पाहा

Maharashtra News Live Update: रायगड जिल्ह्यात अनेक भागात वाहतूक कोंडी

Superstar Scammed: प्रसिद्ध अभिनेत्याची ७ कोटींची फसवणूक, २ वर्षे बँकेतून उडवले पैसे; धक्कादायक घोटाळा उघड

Marathi Actor : मनोरंजनसृष्टी हादरली! प्रसिद्ध मराठी अभिनेत्यावर जीवघेणा हल्ला; ३० जणांच्या टोळक्याने घेरले अन्...

Heart Attack Recovery: हार्ट सर्जरीनंतर हृदय पुन्हा मजबूत कसं करायचं? तज्ज्ञांनी सांगितला व्यायामाचा योग्य नियम; नक्की वाचा

SCROLL FOR NEXT