Father Temple Saam TV
महाराष्ट्र

Father Temple: मुलांनी वडिलांमध्ये देव पाहिला! मृत्यूनंतर गावात उभारलं देवासारखे मंदिर

Hingoli Father Temple News: वडील कायम सोबत राहण्यासाठी दोन भावांनी मिळून, वडिलांचं देवासारखं मंदिर बांधलं आहे.

संदिप नागरे

Hingoli News:

हिंगोलीच्या (Hingoli) बाळापूरमध्ये वडिलांच्या अचानक निधनानंतर कुटुंबात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी आणि वडील कायम सोबत राहण्यासाठी दोन भावांनी मिळून, वडिलांचं देवासारखं मंदिर बांधलं आहे. यासह मूर्ती स्थापन केली आहे. संपूर्ण गावातून या दोन्ही मुलांचं कौतुक होत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संदीप पेंढारकर आणि सचिन पेंढारकर अशी वडिलांचे मंदिर उभारणाऱ्या दोन भावंडांची नावे आहेत. पेशाने ज्वेलर्स विक्रेते असलेल्या, पेंढारकर कुटुंबीयांमध्ये वडील (Father) विश्वनाथ पेंढारकर यांचे 5 नोव्हेंबर 2022 रोजी अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. विश्वनाथ पेंढारकर यांच्या निधनाने पेंढारकर कुटुंबांना मोठा धक्का बसला.

या दुःखातून सावरत कुटुंबाने मंदिर उभारणीचा निर्णय घेतला आणि या कामाला लागलीच सुरुवात देखील केली. विशेष म्हणजे आपल्या मुलांना स्वतःच्या फॉरचुनर कारमध्ये मला फिरवावं, अशी मूर्तीपूर्वी वडिलांची इच्छा होती. मात्र ही इच्छा वडिलांच्या निधनानंतर सचिन यांनी पूर्ण केली आहे.

राजस्थान येथे वडिलांच्या पुतळ्याची पूर्ण तयारी झाल्यानंतर या पुतळ्याचा प्रवास, सचिन यांनी फॉर्च्यूनर गाडीमधून केला. यासाठी त्यांनी गाडीमधील सर्व सीट अरेंजमेंट खोलले होते. दरम्यान येत्या 24 नोव्हेंबर रोजी मुलांनी वडिलांच्या बनवलेल्या पुतळ्याचं दहा हजार नागरिकांच्या उपस्थितीत अनावर केलंय. या निमित्ताने कीर्तन भजन व गोड गोड जेवणाचा कार्यक्रम देखील पेंढारकर कुटुंबीयांच्या वतीने ठेवण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT