Hingoli Crime News Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime: मैत्रीला काळीमा! शिकारीला गेलेल्या तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; मृतदेह लपवण्यासाठी मित्रांचे भयंकर कृत्य

Hingoli News Update: शिकारीला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीच्या कुरुंदा शिवारात घडली.

संदीप नागरे

Hingoli Crime News: हिंगोलीमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. मित्रांसोबत शिकारीला गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना हिंगोलीच्या कुरुंदा शिवारात घडली. धक्कादायक म्हणजे घटनेनंतर मृतदेह लपवण्यासाठी त्याच्या मित्रांनीच मृतदेह विहिरीत फेकला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवनाथ कांबळे हा अल्पवयीन मुलगा आपल्या मित्रांसोबत जंगलात शिकारीला गेला होता. जंगलात फिरत असताना त्याचा विजेचा धक्का लागून दुर्देवी मृत्यू झाला. घडलेल्या घटनेने त्याच्या सोबत असलेले मित्र चांगलेच घाबरुन गेले.

ही घटना लपवण्यासाठी या मुलांनी मृत नवनाथ कांबळेच्या मृतदेहाला दगड बांधून तो एका विहिरीत फेकून दिला. मात्र या घटनेचा उलघडा झाल्यानंतर मुलांचे हे क्रूर कृत्य समोर आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli News)

या प्रकरणी नवनाथ कांबळे याच्या मित्रांविरोधात कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. कर्त्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याने कुटूंबावर शोककळा पसरली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO 3.0: खुशखबर! आता PFचे पैसे UPI ने मिनिटात खात्यात जमा होणार, वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Soft Skin Tips: मऊ आणि मुलायम त्चचेसाठी रात्री चेहऱ्यावर काय लावावे?

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची eKYCची मुदत वाढवली; मंत्री आदिती तटकरेंनी सांगितली २ कारणे

Pune Rain: पुण्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने झोडपले, रस्त्यांना नदीचे स्वरूप; पाहा VIDEO

Celebrity Style Mangalsutra: सेलिब्रिटीस्टाईल शॉ्र्ट आणि युनिक मंगळसूत्र हवेत? हे 5 पॅटर्न नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT