Hingoli Crime News Updates संदीप नांगरे
महाराष्ट्र

बहिणीला छळ होत असल्याचा रागातून भावांनी केला खून; हिंगोलीत खळबळ

२३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना

संदीप नांगरे

हिंगोली: हिंगोलीत (Hingoli) बहिणीला सतत छेडछाड करत असल्याच्या कारणावरून भावांनी २३ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने गळा कापून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हिंगोली (Hingoli) शहरातील तलाबकट्टा परिसरामध्ये मध्यरात्री ही क्रूर हत्तेची घटना घडल्याने हिंगोली शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Hingoli Crime News Updates)

हे देखील पहा-

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तातडीने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या युवकाला हिंगोली (Hingoli) जिल्हा सामान्य रुग्णालयात (hospital) दाखल केले आहे. मात्र, उपचार करण्यापूर्वीच डॉक्टरांनी या युवकाला मृत घोषित केले आहे. शुभम सखाराम राजे असे या हत्या झालेल्या युवकाचे नाव असून तो हिंगोली शहरातील याच परिसरामध्ये राहत असत.

दरम्यान या घटनेप्रकरणी हिंगोली शहर पोलीस (Police) स्थानकात युवकाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ३ आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात देखील घेतल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

सुप्रीम कोर्टात पोहोचला मुख्य निवडणूक आयुक्तांचा वाद; ज्ञानेश कुमारांच्या विरोधातील याचिकेवर होणार सुनावणी

Kothimbir Vadi Recipe: जेवणासोबत खाण्यासाठी बनवा कुरकुरीत आणि चविष्ट कोथिंबीर वडी, वाचा सोपी रेसिपी

Walking 10,000 Steps Daily Benefits: सलग ३० दिवस रोज १०,००० पावले चालल्यास शरीरात काय बदल होईल?

SCROLL FOR NEXT