Hingoli News  Saam TV
महाराष्ट्र

Hingoli Crime News : भेटायला ये नाहीतर तुझ्या वडिलांना संपवतो, एकतर्फी प्रेमातून तरूणानं दिलेल्या धमकीनंतर अल्पवयीन मुलीने...

Crime News : सेनगाव शहरातील हरिओम गल्लीमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तरुणाकडून विनयभंग करण्यात आला आहे.

संदीप नागरे

Hingoli News : पुण्यातील घटनेनंतर राज्यात महाविद्यालयीन तरुणी व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. दरम्यान हिंगोलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सेनगाव शहरातील हरिओम गल्लीमध्ये राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा तरुणाकडून विनयभंग करण्यात आला आहे.

एकतर्फी प्रेमातून आरोपी ओंकार मानकरने हे कृत्य केलं आहे. ओंकारने मुलीच्या फोनवर संपर्क साधत तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र मुलीने भेटण्यास स्पष्ट नकार दिला. यावेळी संतापलेल्या तरुणाने मुलीच्या वडिलांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  (Crime News)

या घटनेनंतर भयभीत झालेल्या अल्पवयीन मुलीने घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी आरोपी ओंकार मानकर याच्या विरोधात सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

सेनगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी ओंकार मानकर याने शहरातून पळ काढला. सेनगाव पोलिसांचे एक पथक आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Opposition Unity : मतदारयाद्यांचा घोळ, निवडणुकीला विरोध? 'सत्याचा मोर्चा'साठी विरोधक एकवटले, VIDEO

रुपाली चाकणकराचं अध्यक्षपद धोक्यात?डॉक्टरचा सीडीआर जाहीर करणं भोवणार?

Jio: धमाकेदार ऑफर, युजर्सला थेट ३५ हजाराचा फायदा, जिओची अनोखी स्किम

पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, 3, 5 आणि 8 रूपयांची नुकसान भरपाई

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक संपली, काय निर्णय झाला? VIDEO

SCROLL FOR NEXT