Hingoli Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News: नराधम पित्याचे क्रूर कृत्य! पोटच्या मुलीवर अत्याचार... मुलीची प्रसुती झाल्यानंतर फुटले बिंग; हिंगोली जिल्ह्यात खळबळ

Hingoli News Update: पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात पोकसो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे.

संदीप नागरे

Hingoli News: बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना हिंगोली जिल्ह्यातून समोर आली आहे. हिंगोलीत जन्मदात्या बापाकडून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार व बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलगी गरोदर राहून तिने बाळाला जन्म दिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. (Crime News In Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, हिंगोली जिल्ह्यातील जुमडा शिवारात बापानेच १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे वडिलांनी वेळोवेळी बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली होती. त्या नंतर या घटनेची कुठे वाच्यता केली तर जीवे मारून टाकू अशी धमकी आरोपी बापाने मुलीसह तीच्या आईला दिल्याने या घटनेची कुठेही वाच्यता झाली नव्हती.

मात्र अखेर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये या अल्पवयीन मुलीची प्रसूती झाली आणि या अत्याचाराच बिंग फुटले. प्रसूतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झालेल्या या अल्पवयीन मुलीने आपला विवाह झाल्यानंतर दोन महिन्यात अपघातामध्ये पतीचे निधन झाले असल्याची माहिती दिली होती.

परंतु रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीसह तिच्या आईच्या हालचाली संशयास्पद वाटू लागल्याने याबाबत पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये वडिलांनीच मुलीवर अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून बासंबा पोलिसांनी नराधम बापाच्या विरोधात पोकसो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT