Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : रात्री कापूस राखण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा निर्घृण हत्या; हिंगोली जिल्ह्यात खळबळ

Hingoli News : सद्या त्यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असल्याने गिराम दररोज शेतात कापूस राखणीसाठी जातात

संदीप नागरे

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात येत असलेल्या मसाई वारंगा गावात आज सकाळी एका शेतकऱ्याच्या खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. रात्रीच्या सुमारास शेतात झोपले असताना अज्ञाताने हल्ला करत खून केला आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे. 

मसाई वारंगा या गावातील साहेबराव गिराम (वय ५५) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Hingoli) साहेबराव गिराम यांची वारंगा मसाई गावापासून हाकेच्या अंतरावर सहा एकर शेती आहे. सद्या त्यांच्या शेतात कापूस वेचणीचे काम सुरू असल्याने गिराम दररोज शेतात कापूस राखणीसाठी जातात. (Crime News) त्यानुसार काल रात्री देखील कुटुंबीयांसोबत रात्रीचे जेवण आटोपून गिराम हे शेतात कापूस राखण्यासाठी गेले होते. मात्र सकाळी लवकर घरी येणारे वडील का आले नाहीत? याचा शोध घेण्यासाठी गिराम यांचा मुलगा शेतात पोहोचला.  

रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पाहून मुलगा हादरला 

त्यावेळी साहेबराव यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याचं त्यांच्या मुलाला निदर्शनास आले. या घटनेची माहिती गावात समजताच गावकऱ्यांनी शेतात धाव घेतली. तसेच कळमनुरी पोलिस देखील तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत साहेबराव यांचा मृतदेह रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला आहे. या घटनेचा कळमनुरी पोलीस शोध घेत असून साहेबराव यांचा इतक्या निर्घृण पणे खून कोणी व का केला याची कारणे पोलीस तपासत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी अमरावतीत पावसाची दमदार हजेरी

माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात उभी फूट; 20 खासदारांनी बनवला वेगळा गट, लोकसभा अध्यक्षांना दिलं पत्र

Chanakya Niti: या ५ कारणांमुळे नवरा बायकोत होतात वाद, वेळीच घ्या योग्य निर्णय नाहीतर...

Aali Lakhabai Song: रौद्र रूप, दमदार नृत्य अन् लोकसंगीताची जादू; अमृता धोंगडेचा 'आली लखाबाई' गाणं प्रदर्शित

Navi Mumbai : सलग ३-४ दिवस लाईट नसल्यानं महिलेचा आक्रोश; उशी - चादर घेऊन थेट महावितरणच्या ऑफिसमध्ये पोहोचली, VIDEO

SCROLL FOR NEXT