Hingoli Crime Saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime : वाळू माफियांची मुजोरी वाढली; महसूल अधिकाऱ्याला थेट डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न

Hingoli News : वाळू माफियांची मुजोरी कायम समोर येत असून रात्रीच्या वेळी नदीतून वाळू उपसा करत वाहतूक केली जात असते. कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना देखील हे जुमानत नसल्याचे समोर आले

संदीप नागरे

हिंगोली : नदीमधून वाळू उपसा करण्याची परवानगी नसताना छुप्या पद्धतीने वाळूची वाहतूक करण्यात येत असते. प्रशासनाच्या नाकावर टिच्चून वाळू माफिया वाहतूक करत असतात. यामुळे त्यांची मुजोरी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरम्यान वाळूची वाहतूक केली जात असताना कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर गुंडागर्दी केल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर महसूल अधिकाऱ्यास डंपरखली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोली जिल्ह्यात समोर आला आहे. 

वाळू माफियांची मुजोरी कायम समोर येत आहे. असे प्रकार वारंवार घडत असून रात्रीच्या वेळी नदीतून वाळू उपसा करत वाहतूक केली जात असते. कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना देखील हे जुमानत नसल्याचे समोर आले आहे. मागील महिन्यात जळगाव जिल्ह्यात देखील रात्रीच्या सुमारास नदीतून वाळू उपसा केला जात असताना कारवाई करण्यासाठी गेलेल्या तलाठीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या प्रकाराने खळबळ उडाली आहे. 

ट्रक खाली करून पळून जाण्याचा प्रयत्न 

हिंगोलीच्या सेनगावमध्ये वाळू माफियांचा हौदोस आणि गुंडागर्दी पाहायला मिळाली आहे. वाळू उपसा केला जात असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करण्यासाठी पथक रवाना झाले होते. धक्कादायक म्हणजे वाळूने भरलेल्या ट्रक पकडल्यानंतर वाळू माफियांनी महसूल पथकाला दमदाटी करत रस्त्यावर वाळूचा ट्रक खाली केला आणि डंपर घेऊन पसार झाले होते. 

डंपर थेट अंगावर घालण्याचा प्रयत्न 

वाळूची चोरी करून अवैध वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने डंपर मालकाच्या सांगण्यावरून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्याला टिप्पर खाली चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी सेनगाव पोलीस स्थानकात नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही सगळी धक्कादायक घटना सेनगाव तालुक्यातील लिंबाळा तांडा परिसरात घडली असून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT