Relatives rush a pregnant woman to hospital after ambulance denied due to fuel shortage in Hingoli. saam tv
महाराष्ट्र

इंधन न मिळाल्यानं आईने गमावलं बाळ, पुरेशा इंधनाचा प्रशासनाचा दावा खोटा

Hingoli Ambulance Fuel Shortage Newborn Death: वेळेत इंधन मिळालं नाही, तर तुम्ही-आम्ही कुठेतरी उशिरा पोहोचू... व्यवसायात दोन पैसे कमी मिळतील... फार-फार तर घरचा स्वयंपाक काही वेळ थांबेल... पण हिंगोलीत याच इंधनटंचाईनं थेट एका निष्पाप, नवजात बालकाचा बळी घेतलाय...पाहुयात या मुर्दाड व्यवस्थेचा हा पर्दाफाश करणारा स्पेशल रिपोर्ट....

Tejal Nagre

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील नालेगाव येथील मनीषा ओमप्रकाश इंगळे या गरोदर मातेला सातव्या महिन्यातच प्रसुती कळा सुरु झाल्या....प्रसूतीसाठी जवळाबाजार प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं..... मात्र, प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्यांना तातडीने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला... पण खरी शोकांतिका इथूनच सुरू झाली...

तातडीने शासनाच्या रुग्णवाहिकेला संपर्क केला. मात्र, 'रुग्णवाहिकेत डिझेलच नाही' असं उत्तर प्रशासनाकडून मिळालं. इंधनाचा तुटवडा असल्याने रुग्णवाहिका जागेवरून हललीच नाही. प्रसूतीच्या कळांनी मनीषा रुग्णालयाच्या आवारात तब्बल दीड तास तडफडत होत्या. अखेर नातेवाईकांनी उसने-पासे करून खाजगी गाडी केली आणि हिंगोली गाठलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. हिंगोली जिल्हा रुग्णालयात सिझरियन दरम्यान बाळाचा मृत्यू झाला.

नियमानुसार रुग्णवाहिकांसारख्या अत्यावश्यक सेवेसाठी नेहमीच इंधनाचा 'राखीव साठा' असायला हवा, असा नियम सांगितला जातोय. पण मग प्रश्न असा उपस्थित होतो की, जर इंधनटंचाई नव्हती आणि राखीव साठा उपलब्ध होता, तर मग मनीषा इंगळे यांना दीड तास रुग्णवाहिकेसाठी का ताटकळत राहावं लागलं? कागदावरचा हा राखीव साठा प्रत्यक्षात कुठे गेला होता?

प्रशासनाचे कागदी दावे काहीही असोत, पण वस्तुस्थिती हीच आहे की डिझेल वेळेत मिळालं नाही म्हणूनच एका आईनं आपलं बाळ गमावलं.... या ढिसाळ आणि मुर्दाड व्यवस्थेवर आता कडक कारवाई होणार की नेहमीप्रमाणे चौकशीचं नाटक करून प्रकरण दाबल जाणार हाच मोठा प्रश्न आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या माजलगावात टायर जाळत रास्ता रोको; लाहमेवाडी येथे प्रशासनाविरोधात संताप

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

वाहनाचे इंजिन ऑइल खराब झाले हे कसं ओळखायचं? ही १ गोष्ट लक्षात ठेवा

Fort History : २६ वर्षे मराठा साम्राज्याची राजधानी, मुघलही थकले, पण जिंकू शकले नाहीत हा अभेद्य किल्ला

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

SCROLL FOR NEXT